क्रिकेटच्या जगतातील स्टार फलंदाज आणि टीम इंडियाची रनमशिन विराट कोहली सध्या कमालीच्या फॉर्ममध्ये आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेनंतर त्याने देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही क्लास शो दाखवून दिला. आता तो न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी विराट कोहलीनं एका खास गोष्टीमुळं लक्षवेधून घेतलं आहे. गेल्या काही वर्षांपासून तो ज्या गोष्टीपासून दूर राहिला त्याकडे तो पुन्हा वळल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'विराट' दूरावा संपला! ३ वर्षांनी विराट कोहली या गोष्टीकडे वळला
११ जानेवारीपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी विराट कोहली कसून सराव करताना दिसत आहे. मालिकेआधी किंग कोहलीनं सराव करतानाचे काही फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. जवळपास ३ वर्षांनी कोहलीनं सराव सत्राचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केले आहेत. विराट कोहली हा सोशल मीडियावर फारसे फोटो शेअर करत नाही. गेल्या काही वर्षांपासून त्याने खास करून सराव सत्रातील फोटो आपल्या अधिकृत अकाउंटवरुन शेअर करणं टाळलं होते. पण हा दूरावा आता संपला आहे. याआधी त्यानं २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलदरम्यान शेवटचे ट्रेनिंग फोटो शेअर केले होते.
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
किंग कोहलीच्या फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सची 'बरसात'
विराट कोहलीने जे फोटो शेअर केले आहेत त्यातील एका फोटोमध्ये तो नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसतो. दुसऱ्या फोटोमध्ये तो संघातील सहकाऱ्यांसोबत ड्रिल्स करताना दिसत असून त्याच्या या फ्रेममध्ये यशस्वी जैस्वालची झलकही पाहायला मिळते. तिसऱ्या फोटोमध्ये तो किटबॅगसह ट्रेनिंग ग्राउंडकडे जाताना दिसतो आहे. नव्या वर्षात विराट कोहलीनं शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सची अक्षरश: 'बरसात' होताना दिसत आहे.
तो फक्त वनडेत सक्रीय, त्यामुळे...
विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त वनडेत सक्रीय आहे. यंदाच्या वर्षी भारतीय संघ १८ वनडे सामने खेळणार आहे. ११ जानेवारीपासून हा सिलसिला सुरु होईल. प्रत्येक सामन्यात विराट कोहली मैदानात उतरावा आणि त्याच्या बॅटमधून खास नजराणा पेश व्हावा, अशीच त्याच्या चाहत्यांची इच्छा असेल.