विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

किंग कोहलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:31 IST2025-04-01T17:23:53+5:302025-04-01T17:31:39+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli Sets Eyes On Winning ODI World Cup 2027 Makes Major 'Big Step Remark Amid Retirement Rumours | विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीनं अवघ्या काही सेकंदात सांगितला भविष्यातील मोठा प्लॅन; व्हिडिओ व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघातील स्टार बॅटर विराट कोहली सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामात व्यग्र आहे. १८ नंबर जर्सी घालून १७ वर्षे 
या लीगमध्ये दिमाखदार कामगिरी करूनही ट्रॉफी हाती न लागलेल्या किंग कोहलीसाठी १८ वा हंगाम तरी लकी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. एका बाजूला किंग कोहलीला आयपीएल चॅम्पियनचा टॅग लागणार का? हा मुद्दा चर्चेत असताना स्टार बॅटरनं आगामी वनडे वर्ल्ड कप संदर्भात केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. किंग कोहलीचा ५ सेकेंदाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

आयपीएल दरम्यान विराट कोहली एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी त्याला भविष्यातील मोठा प्लॅनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर किंग कोहलीनं थोडक्यात उत्तर देत मोठं ध्येय साध्य करण्याची मनातली गोष्ट बोलून दाखवली.  २०२७ मध्ये होणारा आगामी वनडे वर्ल्ड कप जिंकणं हेच लक्ष असेल, अशा आशयाचे वक्तव्य तेने केले.   फक्त ५ सेकंदाच्या व्हिडिओमधून किंग कोहलीनं आपला भविष्याचा प्लॅनच स्पष्ट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसते. 

VIDEO: खुल्लम खुल्ला प्यार! हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड जास्मिन वालिया टीम बसमध्ये शिरली अन्...

 विराटनं पहिल्यांदा व्यक्त केली मनातली गोष्ट

आयपीएल स्पर्धेआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विराट कोहलीनं टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले. पण स्पर्धेनंतर रोहित शर्मानं आपली भूमिका स्पष्ट केली. एवढेच नाहीतर रोहित-विराटचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होताय ज्यात दोघेही तुर्तास थांबण्याचा मूडमध्ये नाहीत, याचे संकेत मिळाले होते. पण पहिल्यांदाच विराट कोहलीनं आगामी वर्ल्ड कपसंदर्भात मनातली गोष्ट बोलून दाखवलीये.  किंग कोहली आता ३६ वर्षांचा आहे. सध्याच्या घडीला तो सर्वात फिट अन् हिट क्रिकेटपैकी एक आहे. त्यामुळे दोन वर्षांनी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये तो सहज खेळू शकतो.

कोहलीची आयपीएलमधील कामगिरी 

विराट कोहलीनं यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची सुरुवात एकदम धमाक्यात केली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्या्च्या भात्यातून ३६ चेंडूत ५९ धावांची खेळी पाहायला मिळाली. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात त्याने ३० चेंडूत ३१ धावा केल्या आहेत. आगामी सामन्यात कामगिरीतील सातत्य कायम ठेवून तो संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. 
 

Web Title: Virat Kohli Sets Eyes On Winning ODI World Cup 2027 Makes Major 'Big Step Remark Amid Retirement Rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.