Virat Kohli New Record : किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

RCB संघाला दिमाखदार विजय मिळवून देताना विराट कोहलीनं नवा इतिहास रचला आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 00:06 IST2026-03-28T23:55:07+5:302026-03-29T00:06:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli Scripts History With Breaks Shoaib Malik Most T20 Run Scoring Record In IPL 2026 Opener RCB vs SRH Match | Virat Kohli New Record : किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

Virat Kohli New Record : किंग कोहलीचा जलवा! पाकिस्तानच्या शोएब मलिकचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

IPL 2026, RCB vs SRH Match, Virat Kohli Goes Past Shoaib Malik In A Special T20 Milestone : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल २०२६ चा उद्घाटन सामना खेळवण्यात आला. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने ठेवलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना चेज मास्टर विराट कोहलीनं नाबाद अर्धशतक झळकावले. या खेळीसह RCB संघाला दिमाखदार विजय मिळवून देताना विराट कोहलीनं नवा इतिहास  रचला आहे. विराट कोहलीनं या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब मलिकचा टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विराट कोहलीनं शोएब मलिकचा विक्रम मोडला अन्...

याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आशियाई फलंदाजांच्या यादीत शोएब मलिक बादशहा होता. पण आता  कोहलीनं त्याचा विक्रम मोडीत काढत आशियाचा नवा सम्राट बनला आहे. शोएब मलिकनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ५५७ सामन्यांत १३,५७१ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने ४१५ सामन्यांतच हा आकडा पार करत नवा इतिहास रचला आहे. आयपीएल २०२६ च्या सलामीच्या लढतीत २७ धावा पूर्ण करताच कोहलीनं या विक्रमाला गवसणी घातली.

कोण आहे Jacob Duffy? ज्यानं पदार्पणाच्या सामन्यात एकाच षटकात अभिषेकसह हेडची केली शिकार

कोणी कोहलीच्या जवळपासही दिसत नाही 

विराट कोहलीनं सनरायझर्स विरुद्धच्या सामन्यात ३८ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६९ धावांची नाबाद खेळी साकारली. आयपीएलमधील त्याचे हे विक्रमी ६४ वे अर्धशतक आहे. एवढी अर्धशतके अन्य कोणत्याही फलंदाजाने झळकावलेली नाहीत. IPL मध्ये सर्वाधिक (८७३०) धावांचा रेकॉर्डही किंग कोहलीच्या नावेच आहे. 
  
आंतरराष्ट्रीय टी-२० मधून निवृत्ती; गत हंगामातील फायनलमध्ये खेळला होता अखेरचा टी-२० सामना

विराट कोहलीने २०२४ मध्ये टी-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारतासाठी त्याने १२५ सामने खेळताना ४,१८८ धावा केल्या आहेत. ज्यात ३८ अर्धशतके आणि एक शतक समाविष्ट आहे. त्यानंतर तो फक्त आयपीएलमध्येच टी-२० क्रिकेट खेळताना दिसतो. गत हंगामातील फायनलनंतर पुन्हा टी-२० खेळताना त्याने धावांसाठी अजूनही भूक असल्याचे दाखवून दिले आहे.

 
 

 

Web Title : विराट कोहली ने शोएब मलिक का रिकॉर्ड तोड़ा, नया टी20 इतिहास रचा।

Web Summary : विराट कोहली ने आईपीएल मैच के दौरान शोएब मलिक के टी20 रिकॉर्ड को तोड़कर एशियाई बल्लेबाजों में सबसे ज्यादा रन बनाने का रिकॉर्ड बनाया। कोहली के नाबाद अर्धशतक ने आरसीबी को जीत दिलाई, जो उनका 64वां आईपीएल अर्धशतक है।

Web Title : Virat Kohli breaks Shoaib Malik's record, creates new T20 history.

Web Summary : Virat Kohli surpassed Shoaib Malik's T20 record for most runs by an Asian batsman during an IPL match. Kohli's unbeaten half-century led RCB to victory, marking his 64th IPL fifty and solidifying his place as a T20 legend.