Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…

वडोदराचं मैदान गाजवल्यावर नेमकं काय म्हणाला विराट कोहली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 23:48 IST

Open in App

IND vs NZ 1st ODI, Virat Kohli On POTM Awards : न्यूझीलंडविरुद्धच्या वडोदराच्या मैदानातील वनडे सामन्यात विराट कोहलीचा जलवा पाहायला मिळाला. त्याचं शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं, पण ९३ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने सामनावीरचा पुरस्कार पटकावला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ व्या वेळी त्याने हा पुरस्कार जिंकला. सामन्यानंतर त्याला तुझ्याकडे किती सामनावीर पुरस्कार आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रामाणिक उत्तर देताना मला याची कल्पना नाही, असे सांगत एकही पुरस्कार माझ्याकडे ठेवत नाही, असे उत्तर विराट कोहलीनं दिले. एवढेच नाही तर सामना गाजवल्यावर मिळालेली ट्रॉफी कुणाला देतो ही अनटोल्ड स्टोरीही त्याने यावेळी शेअर केली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

ना अनुष्का ना वामिका, कोहली 'या' व्यक्तीला देतो आपण जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी

विराट कोहली आपल्या यशात पत्नी अनुष्का शर्मा हिचा मोलाचा वाटा असल्याचे अनेकदा बोलला आहे. पण पुरस्कारासंदर्भातील गोष्ट शेअर करताना ना त्याने अनुष्काचं नाव घेतलं ना ज्या लेकीच्या बर्थडेच्या दिवशी त्याला हा पुरस्कार मिळाला त्या वामिकाचं नाव त्याने सांगितले. मग कोण आहे ती व्यक्ती जिच्याकडे विराट कोहली देतो ट्रॉफी जाणून घेऊया सविस्तर

Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...

नेमकं काय म्हणाला विराट?

तुझ्याकडे किती 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार आहेत? या प्रश्नावर विराट कोहली म्हणाला की, "प्रामाणिकपणे सांगायचं तर मला स्वतःलाही माहीत नाही माझ्याकडे किती ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार आहेत. मी जिंकलेल्या सर्व ट्रॉफी घरी, गुरुग्रामला आईकडे पाठवतो. तिला त्या जपून ठेवायला खूप आवडतात."

विक्रमी कामगिरीसह हुकलेल्या शतकावरही बोलला किंग कोहली

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. या यशाबद्दल तो म्हणाला की, ज्यावेळी माझ्या प्रवास मागे वळून पाहतो त्यावेळी हे सगळं एखाद्या स्वप्नासारखे वाटते. क्षमतेवर विश्वास होता, पण इथंपर्यंत पोहचण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, याचीही जाणीव होती. परमेश्वराच्या कृपेनं अपेक्षेपेक्षा खूप काही मिळाले आहे. त्यामुळे मी माझ्या  प्रवासाकडे आदर कृतज्ञता आणि अभिमानाने पाहतो. शतक हुकल्याची खंत वाटते का? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावेळी तो कोणत्याही माइलस्टोनकडे न पाहता परिस्थितीनुसार खेळ करतो, असे सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli dedicates all 'Player of the Match' awards to his mother.

Web Summary : Virat Kohli, after winning 'Player of the Match', revealed he gives all his trophies to his mother in Gurgaon. He values her support more than personal milestones.
टॅग्स :न्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ