रोहित-विराटच्या फायद्याची गोष्ट; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा खास प्रस्ताव; BCCI काय निर्णय घेणार?

नेमका काय आहे प्रस्ताव?  रोहित-विराटसह टीम  इंडियासाठी तो फायद्याचा कसा ठरू शकतो?  जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:51 IST2026-03-04T16:42:55+5:302026-03-04T16:51:09+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat Kohli Rohit Sharma Get More Game For ODI World Cup 2027 Prep If BCCI Accept Offer From NZ Cricket | रोहित-विराटच्या फायद्याची गोष्ट; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा खास प्रस्ताव; BCCI काय निर्णय घेणार?

रोहित-विराटच्या फायद्याची गोष्ट; न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा खास प्रस्ताव; BCCI काय निर्णय घेणार?

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माच्या फायद्याचा खास प्रस्ताव न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीायकडे ठेवला आहे.  या दोन्ही दिग्गजांनी टी-२० पाठोपाठ कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. ही जोड आता फक्त वनडेत सक्रीय असून जूनमध्ये घरच्या मैदानात रंगणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून ते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधी भारतीय संघ फारसे वनडे सामने खेळणार नाही. पण न्यूझीलंड दौऱ्यात वनडे मालिकेत एक नवा ट्विस्ट येऊ शकतो. जो विराट रोहित दोघांसाठी फायद्याचा ठरेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

 न्यूझीलंड बोर्डाचा BCCI कडे खास प्रस्ताव

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराट रोहितसह अनेक स्टार IPL मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. ही लोकप्रिय स्पर्धा संपली की, भारतीय संघ आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने वनडेवर लक्षकेंद्रीत करेल. याच अनुषंगाने विराट कोहली आणि रोहित शर्माला अधिकाधिक वनडे खेळण्याची संधी देणारा प्रस्ताव न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ठेवला आहे. नेमका काय आहे प्रस्ताव?  रोहित-विराटसह टीम  इंडियासाठी तो फायद्याचा कसा ठरू शकतो?  जाणून घेऊयात सविस्तर

IND vs ENG : टीम इंडियाला ओपन चॅलेंज; पॅट कमिन्सची ‘कॉपी’ करत सॅम करनचा 'शांतीत क्रांती'चा नारा!

वनडे मालिकेची उत्सुकता वाढेलच, याशिवाय....

क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय संघ यंदाच्या वर्षात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसह  २ वनडे आणि २ कसोटी मालिका खेळणार आहे. या नियोजित दौऱ्यात बदल करण्यासंदर्भातील प्रस्ताव न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ठेवला आहे. टी-२० मालिका ३ सामन्यांची करून वनडे मालिकेतील दोन सामने वाढवण्याचा उल्लेख या  प्रस्तावात करण्यात आला आहे. जर बीसीसीआयने याला मंजुरी दिली तर वेळापत्रक त्यानुसार निश्चित होईल. ही गोष्ट न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेची  उत्साह वाढवण्यासोबतच वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल. बीसीसीआय किंवा न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच व्हाइट बॉल क्रिकेटमधील सुधारित वेळापत्र जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.

 भारताचा आगामी वनडे कार्यक्रम

भारतीय संघ जूनमध्ये घरच्या मैदानात अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसह वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धही तीन सामन्यांची वनेड मालिका खेळणार आहे. 
 

Web Title: Virat Kohli Rohit Sharma Get More Game For ODI World Cup 2027 Prep If BCCI Accept Offer From NZ Cricket