Join us
Daily Top 2Weekly Top 5

Big Breaking : विराट कोहलीची कर्णधारपदावरून गच्छंती?; BCCIनं सांगितलं टीम इंडियाचा कर्णधार कोण...

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 13:35 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटीत ६५ सामन्यांत सर्वाधिक ३८ विजय मिळवले आहेत, तर १६ सामन्यांत पराभव व ११ सामने अनिर्णीत राहिले आहेत. वन डेत ९५ सामन्यांत ६५ विजय व २७ पराभव, तर ट्वेंटी-२०त ४५ सामन्यांत २७ विजय व १४ पराभव झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. २०१७ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१९चा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियानं विराटच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे अंतिम व उपांत्य फेरीतपर्यंत धडक मारली. जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२०-२१ स्पर्धेतही टीम इंडियाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यामुळेच आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विराटच्या खांद्यावरून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेतली जाईल, अशी चर्चा दिवसभर सुरू होती. विराटनं कसोटी संघाचे नेतृत्व सांभाळावे आणि मर्यादित षटकांच्या संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवावी, अशी मागणी याआधीही झाली. पण, यावेळी रोहितच ट्वेंटी-२० व वन डे संघाचा कर्णधार बनेल असा दावा केला जात होता.

मँचेस्टर कसोटी रद्द का झाली?; बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं सांगितलं खरं कारण

विराटला फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि त्यामुळे तो कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर या सर्व चर्चा सुरू असताना बीसीसीआयकडून कोणतिच प्रतिक्रिया आली नव्हती. पण, IANS शी बोलताना बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी खूप मोठे अपडेट्स दिले आहेत. ३२ वर्षीय विराट सध्या सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं सर्वाधिक यश मिळवले आहे. विराटनं ३४ वर्षीय रोहित शर्माकडे  भारतीय संघाची धुरा सोपविण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआयच्या सुत्राने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले होते. विराटनं मागील काही महिन्यांत रोहित आणि टीम इंडियाच्या प्रशासनाशी चर्चा केली.

किरॉन पोलार्ड काय खेळला!; २० चेंडूंत धावांचा धो धो पाऊस पाडला, मुंबई इंडियन्सनंही आनंद साजरा केला

बीसीसीआय काय म्हणते?बीसीसीआयच्या खजिनदारांनी IANS ला सांगितले की, विराट कोहली हा टीम इंडियाचा सर्व प्रकारच्या क्रिकेट संघाचा कर्णधार असणार आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीच्या विभाजनाबद्दल आम्ही कोणतीच चर्चा केलेली नाही. या सर्व चर्चा केवळ अफवा आहेत. ''   

टॅग्स :विराट कोहलीरोहित शर्माबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ
Open in App