Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीला मिळाले वाढदिवस आणि दिवाळीचे खास गिफ्ट

कोहलीचा वाढदिवस 5 नोव्हेंबरला असतो. या वर्षी असा एक योगायोग जुळून आला आहे की 5 नोव्हेंबरला दिवाळीलाही सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:23 IST

Open in App
ठळक मुद्देविराटला त्याच्या वाढदिवसाची एक अनोखी भेट त्याच्या चाहत्याने दिली आहे.

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. त्यामुळे त्याला वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी सारेच आतूर आहे. पण विराटला त्याच्या वाढदिवसाची एक अनोखी भेट त्याच्या चाहत्याने दिली आहे.

कोहलीचा वाढदिवस 5 नोव्हेंबरला असतो. या वर्षी असा एक योगायोग जुळून आला आहे की 5 नोव्हेंबरला दिवाळीलाही सुरुवात होत आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा विचार करून नवीन मुंबईतील विराटच्या एका चाहत्याने चांगलीच शक्कल लढवली आहे.

आबासाहेब शेळके हे कलाकार कोहलीचे चाहते आहेत. कोहलीचा वाढदिवस आणि दिवाळी या दोन्ही गोष्टींची सुरेख सांगड घालत त्यांनी विराटला चांगले गिफ्ट दिले आहे. शेळके यांनी रंगीत दिव्याच्या साह्याने विराट कोहलीची ही कलाकृती साकारली आहे. नवी मुंबईतील सी-वूड ग्रँन्ड सेंट्रल मॉलमध्ये विराट कोहलीची रंगीत दिव्यापासून कलाकृती तयार केली आहे.

टॅग्स :विराट कोहलीनवी मुंबई