विराट कोहलीच्या RCB तील स्टार खेळाडूची ३४च्या वर्षी निवृत्ती, भारतात खेळलेला शेवटचा सामना

Kane Richardson Retired: ​​​​​​​१७ वर्षांच्या दमदार कारकीर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:32 IST2026-01-27T13:31:31+5:302026-01-27T13:32:35+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
virat kohli rcb star cricketer kane richardson announces retirement from professional cricket | विराट कोहलीच्या RCB तील स्टार खेळाडूची ३४च्या वर्षी निवृत्ती, भारतात खेळलेला शेवटचा सामना

विराट कोहलीच्या RCB तील स्टार खेळाडूची ३४च्या वर्षी निवृत्ती, भारतात खेळलेला शेवटचा सामना

Kane Richardson Retired: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी त्याने हा निर्णय घेतला. रिचर्डसन हा ऑस्ट्रेलियन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील महत्त्वाचा गोलंदाज मानला जायचा. त्याच्या निवृत्तीमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळातून त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे. सततच्या दुखापती हे निवृत्तीमागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. भारतात खेळलेला सामना हा त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरला.

२०१३ पासून झालेली सुरुवात

रिचर्डसनने २०१३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने ऑस्ट्रेलियासाठी एकूण ६१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्याने ८४ बळी घेतले. त्याने २५ एकदिवसीय सामन्यांत ३९ बळी मिळवले, तर ३६ टी२० सामन्यांत ४५ बळी घेतले. विशेष म्हणजे, त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये भारताच्या गुवाहाटी येथे खेळला होता.

IPL आणि इतर टी२० लीग्स

केन रिचर्डसनने जगभरातील टी२० लीगमध्ये नाव कमावले. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पुणे वॉरियर्स या संघांकडून खेळला. २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया कडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत १५ आयपीएल सामन्यांत १९ बळी घेतले. १३ धावांत ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. २०२१ च्या हंगामासाठी आरसीबीने त्याला ४ कोटी रुपयांना विकत घेतले होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे आणि दुखापतींमुळे त्याला जास्त सामने खेळता आले नाहीत. तसेच, त्याने बिग बॅश लीगमध्ये (BBL) ११८ सामन्यांत १४२ बळी घेतले. केन रिचर्डसनने आपल्या १७ वर्षांच्या व्यावसायिक करिअरमध्ये सर्वाधिक २०१ टी२० सामने खेळले असून त्यात एकूण २४१ बळी घेतले.

Web Title : विराट कोहली की RCB के केन रिचर्डसन ने लिया संन्यास: भारत में खेला अंतिम मैच

Web Summary : ऑस्ट्रेलियाई गेंदबाज केन रिचर्डसन, 34, ने चोटों के कारण क्रिकेट से संन्यास लिया। उन्होंने भारत में अपना अंतिम मैच सहित 61 अंतर्राष्ट्रीय मैच खेले। रिचर्डसन ने RCB और अन्य IPL टीमों का प्रतिनिधित्व किया, 15 मैचों में 19 विकेट लिए। उन्होंने बिग बैश लीग में भी उत्कृष्ट प्रदर्शन किया।

Web Title : RCB's Kane Richardson Retires: Last Match Played in India

Web Summary : Australian bowler Kane Richardson, 34, retires from cricket due to injuries. He played 61 international matches, including his last in India. Richardson represented RCB and other IPL teams, taking 19 wickets in 15 matches. He also excelled in the Big Bash League.