Virat Kohli Overtakes Michael Bevan To Set New World Record : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टी-२० आणि कसोटीतून निवृत्ती घेत त्याने फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेत सक्रीय राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा मध्यम मार्ग निवडल्यावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात झिरो ठरल्यावर किंग कोहलीनं धमाकेदार कमबॅक केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने आपल्या कडक फटकेबाजीचा सिलसिला कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत आंध्र प्रदेशविरुद्धच्या शतकी खेळीनंतर गुजरात विरुद्ध त्याने ७७ धावांची खेळी केली. दिल्लीच्या संघाकडून खेळताना केलेल्या या खेळीसह लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वोत्तम सरासरीच्या बाबतीत कोहलीनं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विराट कोहलीने मोडला जागतिक विक्रम
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ मधील आपल्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीने अनेक वर्षांपासून अबाधित असलेला ऑस्ट्रेलियन मायकेल बेवनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये किमान ५००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च सरासरीच्या बाबतीत विराट कोहली अव्वलस्थानी पोहचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मायकेल बेवन ५७.८६ च्या सरासरीसह पहिल्या स्थानावर होता. गुजरातविरुद्धच्या सामन्यात ६१ चेंडूतील ७७ धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीनं ५७.८७ सरासरीसह मायकेल बेवनला मागे टाकले.
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असलेले फलंदाज
- विराट कोहली (भारत) ५७.८७
- मायकेल बेवन (ऑस्ट्रेलिया) ५७.८६
- सॅम हेन (इंग्लंड) ५७.७६
- चेतेश्वर पुजारा (भारत) ५७.०१
- ऋतुराज गायकवाड (भारत) ५६.६८
- बाबर आझम (पाकिस्तान) ५३.८२
- एबी डी व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ५३.४६
न्यूझीलंड दौऱ्याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाका
टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर भारतीय वनडे संघातील स्थान टिकवण्याचे एक मोठे आव्हान या स्टार क्रिकेटरसमोर उभारले होते. फिटनेस सर्वोत्तम असला तरी मॅच प्रॅक्टिसचे काय? हा मुद्दाही गाजला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दमदार खेळीनंतर विराट कोहलीनं अति सरावापेक्षा क्रिकेटवर फोकस ठेवण्यावर अधिक प्राधान्य देतो, असे स्पष्ट मत व्यक्त केले होते. पण बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये किमान दोन सामने खेळावे, अशी अट घातली. त्यामुळेच १५ वर्षांनी विराट कोहली दिल्लीच्या संघाकडून देशांतर्गत क्रिकेटकडे पुन्हा वळावे लागले. इथं आपला क्लास दाखवत त्याने आगामी न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेत 'विराट' कामगिरी करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.