Virat Kohli Overtakes Kumar Sangakkara To Become 2nd Highest Run-Getter In International Cricket : न्यूझीलंड विरुद्धच्या वडोदरा वनडे सामन्यात विराट कोहलीनं आणखी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकाराला मागे टात तो दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. आता फक्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर हाच कोहलीचा पुढे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं सलग पाचव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फिफ्टी प्लसचा डाव साधत आपल्या कामगिरीतील सातत्याचा खास नजराणाही दाखवून दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वडोदऱ्यातील बीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडेत ३०१ धावांचा पाठलाग करताना कोहलीने ४२ धावा करताच संगकाराला मागे टाकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संगकाराने २८,०१६ धावा केल्या आहेत. भारताच्या डावातील १९ व्या षटकात कोहलीनं संगकाराला मागे टाकले.
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामन्यांत ९,२३० धावा, तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १२५ सामन्यांत ४,१८८ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये त्याने आतापर्यंत ३०९ सामन्यांत १४,५९९* धावा केल्या आहेत.