Join us
Daily Top 2Weekly Top 5

'या' महिला क्रिकेटरने विराट कोहलीला दिली होती लग्नाची ऑफर, आता एका शब्दात दिल्या शुभेच्छा

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्कासोबत लग्नगाठ बांधल्याने एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, अनेक तरुणी आपलं दुख: व्यक्त करताना दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 12:18 IST

Open in App
ठळक मुद्देडॅनियल वेटने तीन वर्षांपुर्वी विराट कोहलीला लग्नाची ऑफर दिली होतीडॅनियल वेटने 4 एप्रिल 2014 ला एक ट्विट करत लिहिलं होतं की, 'कोहली मॅरी मी'लग्नानंतर डॅनियल वेटने पुढील आयुष्यासाठी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत

मुंबई  - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने अनुष्कासोबत लग्नगाठ बांधल्याने एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, अनेक तरुणी आपलं दुख: व्यक्त करताना दिसत आहेत. विराट कोहली अनेक तरुणींच्या मनावर राज्य करतो. अनेक तरुणींचा तो क्रश आहे. आपल्या लूकमुळे विराट नेहमीच तरुणींच्या चर्चेचा विषय असतो. अनेक तरुणींनी सोशल साईटवर विराटशी लग्न करण्याची आपली इच्छा व्यक्त केली होती. यामध्ये एक नाव होतं ते म्हणजे इंग्लंडची क्रिकेट डॅनियल वेट. डॅनियल वेटने तीन वर्षांपुर्वी विराट कोहलीला लग्नाची ऑफर दिली होती. 

डॅनियल वेटने 4 एप्रिल 2014 ला एक ट्विट करत लिहिलं होतं की, 'कोहली मॅरी मी'. त्यावेळी हे ट्विट प्रचंड व्हायरल झालं होतं. अनेकांनी तर विराटने डॅनियल वेटचा प्रस्ताव स्विकारला पाहिजे असा सल्लाही दिला होता. आता जेव्हा विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सात फेरे घेत सात जन्माच्या शपथा घेतल्या आहेत, तेव्हा मात्र डॅनियल वेटने पुढील आयुष्यासाठी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत. डॅनियल वेटने ट्विट केलं की, 'विराट कोहली आणि अनुष्का शर्मा शुभेच्छा'. यावेळी डॅनियल वेटने ट्विटमध्ये इमोजी आणि वेडिंग रिंग लावली आहे. 

डॅनियल वेट इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची ऑलराऊंटर खेळाडू आहे. डॅनियल वेट विराट कोहलीची खूप मोठी चाहती आहे. विराट कोहलीने तिला एक बॅटही भेट म्हणून दिलं होती. डॅनियल वेटने 2010 मध्ये मुंबईत भारताविरोधात आपल्या क्रिकेट करिअरला सुरुवात केली होती. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 11 डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला. सोशल मीडियावर तर दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ अक्षरक्ष: धुमाकूळ घालत आहेत. दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. दोघांच्या लग्नातील प्रत्येक क्षण आणि बातमी मिळवण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दोघांनी कोणते कपडे घातले होते, त्यापासून ते दोघांची लव्हस्टोरी नेमकी कुठून सुरु झाली तिथपर्यंत सर्व काही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत आहे.

अनेकांना असं वाटतंय की, विराट आणि अनुष्काची भेट एका जाहिरातीच्या शुटिंगदरम्यान झाली होती. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. अमर उजालाने दिलेल्या वृत्तानुसार, दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. देहरादूनमध्ये राहत असलेल्या अनुष्काच्या 82 वर्षीय आजी उर्मिला यांनी हा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, दोघे फक्त एकमेकांना ओळखतच नव्हते, तर लहानपणापासून अनुष्काला विराट कोहली आवडत होता. तिचा तो क्रश होता. इतकंच नाही तर दोघे एकमेकांसोबत क्रिकेटही खेळायचे. अनुष्काच्या आजीने सांगितल्यानुसार, अनुष्का जेव्हा लहान होती तेव्हा कोहली त्यांच्या घरी खेळण्यासाठी येत असे. अनुष्काचं संपुर्ण कुटुंब विराट कोहलीला चांगल्या प्रकारे ओळखतं. 

विराट आणि अनुष्काच्या लग्नानंतर आता जंगी पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यांचं रिसेप्शन कार्डही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 21 डिसेंबरला दिल्ली आणि 26 डिसेंबरला बॉलिवूड आणि क्रिकेटर्ससाठी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. रिसेप्शनला मोठमोठे सेलिब्रेटी आणि क्रिकेटर उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :विरूष्का वेडिंगविराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ