Join us

IPL 2021आधीच विराट कोहलीला ICCनं दिली भेट; मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचीही लागली लॉटरी!

 इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 14:30 IST

Open in App

 इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. सर्व खेळाडू दुबईत दाखल झाले आहेत आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCB आयपीएल जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) बुधवारी विराट कोहलीला आनंदाची बातमी दिली. आयसीसीनं जाहीर केलेल्या ट्वेंटी-२० फलंदाजांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक यानंही फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये एन्ट्री घेतली आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं ३-० असा विजय मिळवला. या मालिकेत यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकनं १२१.४२च्या स्ट्राईक रेटनं १५३ धावा केल्या. त्यामुळे त्यानं चार स्थान वर झेप घेतली. आफ्रिकेच्या रिझा हेड्रीक्सनं या मालिकेत ११२ धावा केल्या आणि तोही टॉप २०मध्ये एन्ट्री घेतली. एडन मार्कराम ११ व्या स्थानी घसरला. फलंदाजांमध्ये इंग्लंडचा डेविड मलान ( ८४१), पाकिस्तानचा बाबर आजम ( ८१९) आणि ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच ( ७३३) हे टॉप थ्री आहेत. विराट ७१७ गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे आणि त्यानं डेव्हॉन कॉनवे ( ७००) याला मागे टाकले.  लोकेश राहुल ( ६९९) सहाव्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा एकही खेळाडू टॉप १०मध्ये नाही.  

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीक्विन्टन डि कॉक
Open in App