Join us

विराट कोहलीचे लवकरच 'बॉलिवूड'मध्ये पदार्पण? ट्विटमुळे चाहत्यांमध्ये संभ्रम

भारताचा कर्णधार विराट कोहली लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारा विराट नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 14:43 IST

Open in App

मुंबई : भारताचा कर्णधार विराट कोहली लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. गेली दहा वर्षे भारतीय क्रिकेटचे प्रतिनिधित्व करणारा विराट नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. त्याने केलेल्या ट्विटमुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. 

कोहलीने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. “Trailer: The Movie” असे टायटल असलेल्या फोटोत विराटने अॅक्शन हिरोप्रमाणे पोझ दिलेली पाहायला मिळत आहे. ''दहा वर्षांनंतर आणखी एक पदार्पण, आता वाट पाहवत नाही,'' असे ट्विट केले आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्माबॉलिवूडमधील आघाडीची नायिका आहे. त्यामुळे विराटच्या बॉलिवूड पदार्पणाच्या शक्यता नाकारण्यात येत नाही. दरम्यान, विराटने कपड्यांच्या प्रमोशनसाठी केलेला हा स्टंट असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माबॉलिवूड