Join us

विराट कोहली ' या ' दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये झाला सामील

कोहलीने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. पण आयसीसीने केलेल्या एका ट्विटनुसार कोहली हा ' या ' दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये झाला सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 21:16 IST

Open in App
ठळक मुद्देयापूर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने हा पराक्रम केला होता.

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात 200 धावा केल्या आणि त्याने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. पण आयसीसीने केलेल्या एका ट्विटनुसार कोहली हा ' या ' दिग्गज खेळाडूंच्या क्लबमध्ये झाला सामील

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. कोहलीने या सामन्याच्या पहिल्या डावात 149 आणि दुसऱ्या डावात 51 धावा केल्या होत्या. या कामगिरीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला मागे सारत अव्वल स्थान पटकावले होते.

आयसीसीनुसार एकाच वेळी कसोटी आणि एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला नववा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने हा पराक्रम केला होता. सचिनसह क्रिकेट जगतात केथ स्टॅकपोल, सर विव रीचर्ड्स, जावेद मियाँदाद, ब्रायन लारा, जॅक कॅलिस, रिकी पॉन्टिंग आणि हशिम अमला यांनी हा पराक्रम ठरला आहे. अमलानंतर हा पराक्रम करणारा कोहली हा नववा खेळाडू ठरला आहे.

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडूलकरआयसीसीजावेद मियादाद