Join us

IND vs AUS: "विराट कोहली आता अशा टप्प्यावर आहे की..."; माजी क्रिकेटपटूचा ऑस्ट्रेलियाला इशारा

Virat Kohli, IND vs AUS Test: भारतीय संघाचा दमदार फलंदाज विराट कोहलीबाबत न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकाने त्यांच्या संघाला इशारा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:43 IST

Open in App

Virat Kohli, IND vs AUS Test: टीम इंडियाने बांगलादेशला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला. आजपासून भारताची न्यूझीलंडविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. WTC Final पूर्वी भारतीय भूमीवर ही भारताची शेवटची कसोटी मालिका असणार आहे. त्यानंतर भारताचा २६ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौरा सुरु होणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारताशी कसोटी मालिका खेळत आहे. पण तिकडे ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी तयारीला लागला आहे. याच दरम्यान, भारतीय संघाचा दमदार फलंदाज विराट कोहलीबाबत ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटूने त्यांच्या संघाला इशारा दिला आहे.

"विराट कोहली हा सध्या त्याच्या कारकीर्दीच्या अशा टप्प्यावर उभा आहे जिथे त्याला फक्त संघासाठी खेळायचं आहे आणि भारताला सामने जिंकवून द्यायचे आहेत. विराटच्या मनात असलेला असा विचार हा प्रतिस्पर्धी संघांसाठी घातक आहे. कारण विराट निर्भिडपणे मैदानात उतरेल आणि मनसोक्त फटकेबाजी करेल. खेळताना विराटचे लक्ष वैयक्तिक धावसंख्या किंवा कुठल्याही रेकॉर्डवर नसेल. त्यामुळे त्याला कसलीही भीती नसेल. अशा वेळी मोठी खेळी आपोआपच शक्य होते," असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर माइक हेसन याने दिला.

दरम्यान, भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा हा २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी असा प्रदीर्घ काळाचा आहे. मालिका सुरु होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला एक मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमेरॉन ग्रीन ( Cameron Green ) याने या मालिकेतून माघार घेतली. ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनच्या मणक्याच्या हाडावर भार येत असल्याने फ्रॅक्चर झाले आहे. या आठवड्यात त्याच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी दिली. पाठदुखीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरून लवकर मायदेशी परतला होता. यानंतर, काही चाचण्या आणि स्कॅन करण्यात आले, ज्यावरून असे दिसून आले की त्याला लवकरात लवकर ही शस्त्रक्रिया आवश्यक आहे. वेगवान गोलंदाजांसाठी मणक्यामध्ये तणाव आणि फ्रॅक्चर येणे ही बाब धोक्याची असते. त्यामुळे दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी त्याला लवकर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलियाविराट कोहली