Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहली काही तासांच्या गोंधळानंतर अखेर इन्स्टाग्रामवर परतला..!! नेमकं काय घडलं होतं?

Virat Kohli Instagram Account: आज सकाळी अचानक विराट इन्स्टाग्रामवरून गायब झाला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 10:17 IST

Open in App

Virat Kohli Instagram Account: भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली काही तासांच्या गोंधळानंतर अखेर इंस्टाग्रामवर परतला. विराटचे अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले. शुक्रवारी विराट कोहलीचेइन्स्टाग्राम अकाउंट अचानक बंद झाले होते. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. हे अचानक कसे घडले, याचा सर्वांनाच प्रश्न पडला होता. पण अखेर काही तासांनंतर अचानक विराट कोहलीचे अकाउंट इन्स्टाग्रामवर पुन्हा दिसू लागले.

नेमके काय झाले होते?

विराट कोहली याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट शुक्रवारी सकाळी अचानक बंद झाले. जेव्हा चाहत्यांनी त्याचे अकाउंट शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना This page isn't available असा मेसेज दिसला. २७४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेल्या विराट कोहलीचे अकाउंट अचानक दिसेनासे झाल्यामुळे जगभरातील चाहते गोंधळून गेले. तसेच, आता हे चाहते विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिच्याकडे याबाबत उत्तर मागताना दिसले.

तांत्रिक अडचण

विराटने स्वतःहून अकाउंट डीएक्टिव्हेट केले, की हे एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा हॅकिंगमुळे झाले, याबद्दल काहीच अधिकृत माहिती मिळाली नाही. आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे, विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली याचेही इंस्टाग्राम अकाउंट त्याच सुमारास बंद झाल्याचे चाहत्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत गूढ वाढले होते. पण त्यानंतर काही वेळातच सर्व इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा दिसू लागली.

चाहत्यांचे अनुष्काला प्रश्न

विराटकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने संतप्त आणि चिंतेत असलेल्या चाहत्यांनी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रश्नांची सरबत्ती केली. "चीकू कुठे गेला?", "भाभी, भाईचे अकाउंट का दिसत नाहीये?", "किंगला परत यायला सांगा" अशा अनेक कमेंट्स अनुष्काच्या प्रोफाइलवर पाहायला मिळाल्या.

विराटच्या इंस्टाग्रामवर परतण्याने चाहते आनंदी

विराट कोहलीच्या इंस्टाग्रामवर परतण्याने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला. इंस्टाग्रामवर त्याचे २७४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्याच्या परतण्याने त्या सगळ्यांना नक्कीच आनंद झाला. दरम्यान, हे कशामुळे घडलं होतं, याची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli Returns to Instagram After Brief Disappearance: What Happened?

Web Summary : Virat Kohli's Instagram account briefly disappeared, causing concern among fans. The account, boasting 274 million followers, was inaccessible for a few hours before mysteriously returning. The reason for the outage, which also affected his brother's account, remains unknown, prompting worried fans to question Anushka Sharma.
टॅग्स :विराट कोहलीइन्स्टाग्रामअनुष्का शर्मा