Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक झालं गायब; चाहत्यांचा अनुष्का शर्माकडे प्रश्नांचा भडीमार

Virat Kohli Instagram Account Deactivated: काही वेळाने हे अकाऊंट पुन्हा इन्स्टाग्रामवर दिसू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 08:36 IST

Open in App

Virat Kohli Instagram Account Deactivated: भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज आणि स्टार सेलिब्रिटी विराट कोहली याचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट शुक्रवारी सकाळी अचानक बंद झाले. जेव्हा चाहत्यांनी त्याचे अकाउंट शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना This page isn't available असा मेसेज दिसला. २७४ मिलियनहून अधिक फॉलोअर्स असलेल्या विराट कोहलीचे अकाउंट अचानक दिसेनासे झाल्यामुळे जगभरातील चाहते गोंधळून गेले आहेत. तसेच, आता हे चाहते विराटची पत्नी अनुष्का शर्मा हिच्याकडे याबाबत उत्तर मागताना दिसत आहेत.

अकाउंट बंद की तांत्रिक अडचण; भावाचे अकाउंटही बंद

विराटने स्वतःहून अकाउंट डीएक्टिव्हेट केले आहे, की हे एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे किंवा हॅकिंगमुळे झाले आहे, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आश्चर्याची आणि धक्कादायक बाब म्हणजे, विराट कोहलीचा भाऊ विकास कोहली याचेही इंस्टाग्राम अकाउंट त्याच सुमारास बंद झाल्याचे चाहत्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.

नंतर अकाउंट पुन्हा दिसू लागले

नंतर मात्र त्याचे अकाउंट काही युजर्सने दिसू लागले तर काहींना दिसत नव्हते. काही ठिकाणी मोबाईलमध्ये दिसत होते, तर डेस्कटॉप युजरना दिसत नव्हते. त्यामुळे हा तांत्रिक मुद्दा असल्याचे बोलले जात आहे.

चाहत्यांचे अनुष्काला प्रश्न

विराटकडून कोणतीही माहिती न मिळाल्याने संतप्त आणि चिंतेत असलेल्या चाहत्यांनी त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या इंस्टाग्राम पोस्टवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. "चीकू कुठे गेला?", "भाभी, भाईचे अकाउंट का दिसत नाहीये?", "किंगला परत यायला सांगा" अशा अनेक कमेंट्स अनुष्काच्या प्रोफाइलवर पाहायला मिळत आहेत.

सोशल मीडियावरील चर्चा

काही चाहत्यांच्या मते विराटने 'डिजिटल डिटॉक्स' (सोशल मीडियापासून ब्रेक) साठी हे पाऊल उचलले असावे, तर काहींनी याला एखाद्या मोठ्या जाहिरात मोहिमेचा (Brand Campaign) भाग म्हटले आहे. एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर यासंदर्भात अनेक मिम्स आणि तर्क-वितर्क व्हायरल होत आहेत.

दरम्यान, विराट कोहली सध्या त्याच्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. त्याने अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. तो आता आयपीएल २०२६च्या तयारीला लागणार आहे. इंस्टाग्रामवरून गायब झाला असला तरी, त्याचे 'एक्स' (X) अकाउंट अद्याप सक्रिय आहे. इन्स्टाग्रा संदर्भात विराट कोहलीच्या मॅनेजमेंट टीमकडून किंवा मेटा (Meta) कडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Virat Kohli's Instagram Disappears; Fans Flood Anushka Sharma with Questions

Web Summary : Virat Kohli's Instagram account suddenly vanished, puzzling fans. His brother's account also went down. Fans questioned Anushka Sharma, speculating about a digital detox or brand campaign. The account later reappeared for some users, suggesting a technical glitch. Kohli is currently in London.
टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माइन्स्टाग्राम