Join us

Virat Kohli, IND vs ENG : विराट कोहलीचा Barmy Army केलेला अपमान जिव्हारी लागला; नेटिझन्सने इंग्लंड क्रिकेट बोर्डाला दाखवली जागा 

India vs England 5th Test मध्ये विराट कोहली व बेअरस्टो यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते आणि इंग्लंडच्या विजयानंतर क्रिकेट बोर्डाने त्या खटक्यावरूनच विराट कोहलीला ट्रोल केले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 12:46 IST

Open in App

IND vs ENG 5th Test : भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवून झाल्यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू झालं आहे.  भारताचे ३७८ धावांचे लक्ष्य जो रूट व  जॉनी बेअऱस्टो यांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला.  या सामन्यात विराट कोहली व बेअरस्टो यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे पाहायला मिळाले होते आणि इंग्लंडच्या विजयानंतर क्रिकेट बोर्डाने त्या खटक्यावरूनच विराट कोहलीला ट्रोल केले. 

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दोन फोटो पोस्ट केले. त्यापैकी पहिल्या फोटोत विराट कोहली इंग्लंडचा फलंदाज बेअऱस्टो याला तोंड बंद ठेव असे बजावताना दिसतोय, तर दुसऱ्या फोटोत पराभावनंतर तोच विराट बेअरस्टोला मिठी मारून अभिनंदन करतोय. यावेळी विराटचा चेहरा पडलेला दिसतोय. ECB ने या दोन्ही फोटोंवर  दिलेला इमोजी विराटला ट्रोल करणारा आहे. हे कमी होतं की काय Barmy Army नेही ट्विट करून विराटचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विराट व जॉनी बेअरस्टो यांच्या वादातला एक फोटो पोस्ट केला. त्यावर त्यांनी लिहिले की, विराट कोहलीला मागील १८ महिन्यांत जेवढ्या धावा करता आलेल्या नाहीत तेवढ्या  जॉनी बेअरस्टोने मागील २५ दिवसांत केल्यात..   यानंतर नेटिझन्सनी ECB  व Barmy Army ला झोडपले...  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीसोशल मीडिया
Open in App