Join us  

जेव्हा विराट कोहली करतो 'गब्बर'चा हेड मसाज

विराटला जरी केपटाऊनमधील सामान्यात खेळता आलं नसलं तरीही त्याचं पूर्ण लक्ष टीमवर होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 12:21 PM

Open in App

मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या निर्णायक तिसऱ्या टी-20 सामन्यात कमरेच्या दुखापतीमुळे खेळता आलं नाही. चार शतकांसह धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराट कोहलीला शेवटच्या सामन्यात संघाबाहेर राहावं लागलं.

विराट कोहलीच्या गैरहजेरीमध्ये रोहित शर्माने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. विराटला जरी केपटाऊनमधील सामान्यात खेळता आलं नसलं तरीही त्याचं पूर्ण लक्ष टीमवर होतं. टीम इंडियाची बॅटिंग सुरु असताना शेवटच्या ओव्हरवेळी विराट कोहली ड्रेसिंग रूममध्ये शिखर धवनचं हेड मसाज करत होता. विराट शिखर धवनचं हेड मसाज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, केपटाऊनमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. रोहित व शिखर धवनने खेळाची सुरूवात केली. रोहित 11 धावा करून स्वस्तात बाद झाला पण दुसरीकडे शिखर धवनने बाजू सावरून धरली. 47 धावांवर शिखर आऊट झाला त्यावेळी भारताचा स्कोअर 126/4 होता. 173 धावांचा पाठलाग करताना दक्षिणा आफ्रिकेने 165 धावा केल्या. भारताने हा सामना 7 धावांनी जिंकत सीरिज 2-1 ने आपल्या नावे केली.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहलीशिखर धवनभारतीय क्रिकेट संघ