विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

इंडियन प्रीमिअर लीगमध्येही (आयपीएल) विराटला रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूला एकही जेतेपद पटकावून देता आलेले नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:34 PM2020-06-15T14:34:22+5:302020-06-15T14:35:18+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli has won nothing as a leader, has a lot to achieve: Gautam Gambhir | विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

विराट कोहलीनं कर्णधार म्हणून मोठं यश मिळवलेलं नाही - गौतम गंभीर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं टीम इंडियासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करणारा फलंदाज आहे. भारताच्या अनेक विजयात कोहलीचा सिंहाचा वाटा असतो आणि त्यानं आतापर्यंत अनेक विक्रम मोडले आहेत. पण, कर्णधार म्हणून त्याला अजून एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारतीय संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीर यानंही कोहलीला कर्णधार म्हणून आणखी स्वतःला सिद्ध करावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे.

मागील काही वर्षांत टीम इंडियाची जबाबदारी कोहलीनं स्वतःच्या खांद्यावर सक्षमपणे पेलली आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत. वन डे क्रिकेटमध्ये त्यानं 11867 धावा केल्या आहेत आणि सर्वात जलद 10000 धावा करण्याचा विक्रम त्यानं नावावर केला आहे. त्यानं 205 डावांमध्ये हा पल्ला गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांत तो दुसऱ्या स्थानावर आहे. पण, त्याची वैयक्तिक कामगिरी टीम इंडियाला आयसीसी स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावून देण्यात मदत करत नाही. 

2017मध्ये त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद आलं. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आणि 2019च्या वन डे वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण, भारताला जेतेपद पटकावता आले नाही. कोहलीची फलंदाजी आणि नेतृत्व क्षमता याच्यात बराच फरक आहे, असे गंभीर म्हणाला. ''हा सांघिक खेळ आहे. तू सातत्यानं धावा करू शकतोस. ब्रायन लारासारख्या दिग्गजानेही खोऱ्या नं धावा केल्या आहेत. जॅक कॅलिसनेही कारकिर्दीत काहीच जिंकलं नाही. विराट कोहलीनंही कर्णधार म्हणून काहीच जिंकलेलं नाही. त्याला अजून बरंच काही जिंकायचे आहे,''असे गंभीर म्हणाला. 

त्यानं पुढे सांगितले की,''तुम्ही सातत्यानं धावा करता, परंतु जोपर्यंत तुम्ही मोठी स्पर्धा जिंकत नाही, तोपर्यंत तुमची कारकिर्द परिपूर्ण होत नाही.'' कोहलीच्या नेतृत्वकौशल्यावर अनेक खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे. युवा खेळाडूंना तो पाठींबा देत नसल्याचे बोलले जाते. गंभीरनंही त्याच्या  नेतृत्वकौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही (आयपीएल) विराटला रॉयल्स चॅलेंजर बंगळुरूला एकही जेतेपद पटकावून देता आलेले नाही. 

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

Web Title: Virat Kohli has won nothing as a leader, has a lot to achieve: Gautam Gambhir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.