Join us

Virat Kohli Kane Williamson Video: विराटचं 'गोल्डन डक', विल्यमसनचं 'डायमंड डक'.. दोन मित्रांबरोबर काय घडलं पाहा (IPL 2022)

बंगलोरने हैदराबादवर मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 21:51 IST

Open in App

Virat Kohli Kane Williamson Video: वानिंदू हसरंगाने १८ धावांत घेतलेल्या ५ बळी घेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर ६७ धावांनी मोठा विजय मिळवला. कर्णधार फाफ डू प्लेसिसचं नाबाद अर्धशतक आणि दिनेश कार्तिकची फटकेबाजी यांच्या जोरावर RCB ने २० षटकांत SRH ला १९३ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात SRH कडून राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावलं. या सामन्यात एक अजब गोष्ट घडली. दोनही डावांच्या पहिल्या चेंडूवर दोन दिग्गज खेळाडू शून्यावर बाद झाले. फक्त त्यांच्यात एक छोटासा फरक दिसून आला. (IPL 2022 RCB vs SRH Live)

सामन्याचा पहिला चेंडू खेळण्यासाठी विराट कोहली मैदानात आला. त्याने डावाच्या पहिल्याच चेंडूवर फटका खेळला आणि तो पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. यंदाच्या हंगामात तब्बल तिसऱ्यांदा विराट पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झाला म्हणजेच 'गोल्डन डक'चा धनी ठरला. त्यानंतर दुसऱ्या डावात केन विल्यमसनदेखील पहिल्या चेंडूवर बाद झाला. मात्र तो धावचीत झाला. त्याला एकही चेंडू न खेळता माघारी जावे लागलं. त्यामुळे तो डायमंड डकचा धनी ठरला.

विराट कोहली गोल्डन डक-

केन विल्यमसन डायमंड डक-

दरम्यान, बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिस आणि रजत पाटीदारच्या १०५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर चांगली सुरूवात केली. रजत पाटीदारने ४८ धावा केल्या. तर संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस २० षटके खेळून ७३ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या टप्प्यात दिनेश कार्तिकने ८ चेंडूत नाबाद ३० धावा करत संघाला १९२ धावांपर्यंत नेले. आव्हानाचा पाठलाग करताना एडन मार्करमने २१ धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने अर्धशतक झळकावले. पण वानिंदू हसरंगाच्या फिरकीने हैदराबादचा निम्मा संघ गुंडाळला. त्यामुळे त्यांचा ६७ धावांनी पराभव झाला.

टॅग्स :आयपीएल २०२२विराट कोहलीकेन विल्यमसनरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App