Virat Kohli, Greeting Card daughter Vamika, Fathers Day 2025: मुलांना वाढवणे, त्यांचे संगोपन करणे ही बाब खूपच आव्हानात्मक असते. मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी आई इतकीच वडिलांचीही असते. अनेक सेलिब्रिटी आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. पण त्यातही काही सेलिब्रिटी आपल्या मुलांसोबत शक्य तसा छान वेळ घालवतात. भारताचा प्रतिभावान फलंदाज विराट कोहली हा त्यापैकी एक. विराट हा क्रिकेटच्या दौऱ्यामुळे कायम प्रवासात व्यग्र असतो. पण जेव्हा त्याला वेळ मिळतो, तेव्हा तो मुलगी वामिका आणि मुलगा अकाय या दोघांसोबत छान मजा-मस्ती करतो. वामिकादेखील विराटवर खूप प्रेम करते. तिने आज फादर्स डे च्या निमित्ताने 'बाबा' विराटसाठी एक खास संदेश देणारं ग्रिटींग कार्ड बनवलं आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्माने ते पोस्ट केले आहे.
ग्रिटींग कार्डमध्ये वामिकाचा खास संदेश
वामिकाने ग्रिटींग कार्डमध्ये लिहिले आहे- 'माझा बाबा मला भावासारखाच वाटतो. तो खूप खेळकर आहे. तो माझ्यासोबत मजा-मस्ती करत असतो. मी त्याच्यासोबत मेक-अपचा खेळ खेळते. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि तोदेखील माझ्यावर खूप प्रेम करतो. (दोन्ही हात परसून मिठी)... हॅप्पी फादर्स डे ... वामिका'
अनुष्का शर्माने ही पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनुष्काने तिच्या वडिलांचाही फोटो पोस्ट केला आहे. माझ्या आयुष्यात मी ज्या पहिल्या माणसावर प्रेम केलं, ते माझे वडील... त्यांच्यासह संपूर्ण जगभरातील सर्वांच्या वडिलांना 'हॅप्पी फादर्स डे'.