Join us

Asia Cup 2022, IND vs PAK : पाकिस्तानला झोडण्यासाठी विराट कोहलीचं खास ट्रेनिंग; Mask लावून सराव करतानाचे फोटो व्हायरल, जाणून घ्या महत्त्व

Asia Cup 2022 India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या Super 4 मधील लढतीत येत्या रविवारी India vs Pakistan असा सामना रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 07:30 IST

Open in App

Asia Cup 2022 India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा महामुकाबला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या Super 4 मधील लढतीत येत्या रविवारी India vs Pakistan असा सामना रंगणार आहे. पाकिस्तानने शुक्रवारी झालेल्या लढतीत हाँगकाँगवर १५५ धावांनी दणदणीत विजय मिळवून सुपर ४ मध्ये प्रवेश केला. पाकिस्तानच्या आधी अफगाणिस्तान,  भारत व श्रीलंका यांनी आगेकूच केली होती. आता आशिया चषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीत चार स्पर्धक राहिले आहेत आणि आता खरी मजा पाहायला मिळणार आहे. सर्व संघ अधिक ताकदीने मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघानेही एका दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी पुन्हा सरावाला सुरुवात केली अन् माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) विशेष ट्रेनिंग करताना दिसला. तो विशिष्ट प्रकारचा मास्क घालून सराव करताना दिसला.

भारताने आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला होता. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी करताना विजयी षटकार खेचला होता. त्याने त्या सामन्यात ३ विकेट्स व नाबाद ३३ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमारने चार विकेट्स घेतल्य, तर रवींद्र जडेजाने संयमी खेळ करताना भारताचा डाव सावरला होता. पण, आता रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे आणि त्याच्याजागी दीपक हुडा किंवा अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकले. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेऊन हार्दिक पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. पाकिस्तानचे १५५ धावांनी विजय मिळवून मनोबल उंचावले आहे. त्यामुळे रविवारी ४ सप्टेंबरला कट्टर मॅच पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. Virat Kohli using a high-altitude mask during cardio training - या सामन्यासाठी विराट कोहली सज्ज आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याने ३५, तर हाँगकाँगविरुद्ध नाबाद ५९ धावा केल्या होत्या. आता त्याला पाकिस्तानविरुद्ध आणखी मोठी खेळी करायची आहे. त्यासाठी त्याने शुक्रवारी विशेष सराव केला. कार्डिओची ट्रेनिंग करताना त्याने मास्क घातला होता. त्याला हाय अल्टिट्यूड मास्क असे म्हणतात. अशी ट्रेनिंग एलिट खेळाडू, विशेषत: लांब पल्ल्याचे धावपटू फुफ्फुसे आणि श्वासोच्छवासाचे स्नायू बळकट करण्यासाठी करतात.

 

टॅग्स :एशिया कप 2022विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App