Join us

'राम सिया राम'चे मधुर स्वर कानावर पडले अन् विराट कोहली भक्तीत तल्लीन झाला, Video 

IND vs SA 2nd Test : मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:49 IST

Open in App

IND vs SA 2nd Test  (Marathi News) :  मोहम्मद सिराजने ( Mohammed SIRAJ ) दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी भन्नाट गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याला जसप्रीत बुमराह व मुकेश कुमार यांची मिळालेली साथ अप्रतिम होती. या दोघांनी प्रत्येकी २ विकेट्स घेताना आफ्रिकेचा पहिला डाव १२१ मिनिटांत ५५ धावांत गुंडाळला. भारताविरुद्ध कोणत्याही संघाची कसोटीतील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) भक्तीत तल्लीन झालेला पाहायला मिळाला.

आजच्या सामन्यात आफ्रिकेच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. डेव्हिड बेडिंगहॅम ( १२) व कायले वेरेयने ( १५) वगळल्यास एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. आफ्रिकेचा पहिला डाव २३.२ षटकांत अवघ्या १२१ मिनिटांत ५५ धावांवर गडगडला. यापूर्वी २००८मध्ये भारताचा पहिला डाव २० षटकांत ११० मिनिटांत ७६ धावांवर गुंडाळला गेला होता आणि डेल स्टेनने २३ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. या सामन्यात केशव महाराज जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा राम सिया राम हे गाणं वाजवलं गेलं... केशव महाराज जेव्हा मैदानावर येतो तेव्हा हे गाणं वाजतंच... 

सध्या देशात अयोध्येतील राम मंदिरामुळे वातावरण भक्तीमय झालेले असताना आफ्रिकेतही विराट कोहली राम सिया राम या सूरांवर भक्तीत तल्लीन झालेला दिसला.  

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाऑफ द फिल्डविराट कोहली