Join us

हस के बात नहीं करने का इनसे..."; विराट कोहलीने भरमैदानातच मोहम्मद सिराजला दिला दम?

Virat Kohli Mohammed Siraj Video, IND vs AUS 4th Test at MCG: विराट कोहली मैदानावर नेहमीप्रमाणे खूपच आक्रमक झाल्याचे दिसून आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:13 IST

Open in App

Virat Kohli Mohammed Siraj Video: बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील बॉक्सिंग डे टेस्ट (Aus vs Ind 4th Test) आज सुरु झाली. पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियन संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात ३११ धावा केल्या. पदार्पणाचा सामना खेळणारा सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या चौघांनीही अर्धशतके झळकावली आणि संघाचा त्रिशतकी मजल मारून दिली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एकही बळी मिळाला नाही. मात्र त्याला विराट कोहलीने दिलेल्या एका सल्ल्याची चांगलीच चर्चा झाली.

विराट कोहली आणि सॅम कॉन्स्टास यांच्यात मैदानावर थोडीशी वादावादी झाली. त्यामुळे विराट मैदानात नेहमीप्रमाणेच प्रचंड आक्रमक झाला. असे असताना मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ चिवट फलंदाजी करत होते. सिराज लाबूशेनशी गोलंदाजी दरम्यान काहीतरी गप्पा मारताना दिसला. त्यावर विराट कोहली म्हणताना दिसला, "हस के बात नहीं करने का इनसे" (या लोकांशी हसून बोलायचं नाही). त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओ अनेक क्रिकेटप्रेमीही कमेंट करताना दिसत आहेत.

विराटने सॅम कॉन्स्टासला मारला खांदा, पुढे काय?

मोहम्मद सिराजने १० वे षटक पूर्ण केल्यावर सॅम कोन्स्टास दुसऱ्या एन्डला जात असताना कोहलीनं युवा क्रिकेटरच्या खांद्यावर खांदा मारला. त्यानंतर युवा खेळाडूनं कोहलीला काहीतरी म्हटलं. मग कोहली पुन्हा त्याच्या दिशेने आला. दोघांच्यातील वाद मिटवण्यासाठी मैदानातील पंच मायकल गफ यांच्यासह ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजानं मध्यस्थी केली. आयसीसी या प्रकरणाची चौकशी करणार असून जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. या प्रकरणात मॅच रेफ्री अँडी पाइक्राफ्ट काय निर्णय घेणार ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीमोहम्मद सिराजआॅस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथ