Join us
Daily Top 2Weekly Top 5

'विराट कोहली हा क्रिकेटचा ख्रिस्तियानो रोनाल्डो'  

भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 10:38 IST

Open in App

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे अशी विराटची स्तुती वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ड्वेन ब्राव्होने केली आहे. भारतात सध्या आयपीएलचे आकरावे सत्र सुरु आहे. विराट कोहली बंगळुरु संघाकडून तर ब्राव्हो चेन्नई संघाकडून खेळत आहे. दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोप्रमाणे विराट कोहली आहे. त्याची फिटनेस आणि खेळण्याची शैली खूप वेगळी आहे. विराट कोहलीसोबत माझे चांगले संबंध आहेत असेही ब्राव्हो म्हणाला. 

विराट कोहली आणि माझा लहान भाऊ डॅरेन अंडर 19 मध्ये क्रिकेट खेळले आहेत. मी कायमच माझ्या भावाला   विराटच अनुकरण करायला सांगत होतो. कारण खेळाप्रती विराट स्वतला पूर्णपणे वाहून देतो. मी विराटचे त्यावेळी अनुकरण करु शकत नव्हतो कारण मी राष्ट्रीय संघात होतो.  पुढे तो म्हणाला की,  माझ्या भावाशी क्रिकेट संदर्भात बोलावे त्याला खास मार्गदर्शन करावे.  असा मी विराटला खूप वेळा अग्रह केला होता. ज्यावेळी मी विराट कोहलीला बघतो तेव्हा मला वाटतं की, तो क्रिकेटचा क्रिस्टियानो रोनाल्डो असल्याचे मला वाटते. 

टॅग्स :विराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डो