Join us

कॅप्टन कोहलीचे प्रशिक्षक करणार कणकवलीच्या मुलांना मार्गदर्शन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 17:10 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे कोहली फलंदाजी करताना प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या मनात धडकी भरलेली असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही सलग तिसऱ्या वर्षी कोहलीला सर्वोत्तम खेळाडूने गौरविले आहे. कोहलीची प्रत्येक खेळी ही नव्या विक्रमाला गवसणी घालणारी असते आणि असा हा विक्रमवीर फलंदाज घडवणारे प्रशिक्षक राजकुमार शर्मा कणकवलीतील खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत.

आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले की,''भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचे मार्गदर्शक व पहिले प्रशिक्षक राजकुमार शर्मा हे 9 मे रोजी कणकवलीत येणार आहेत. येथील व्ही के क्रिकेट अकादमीत ते युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतील.''  

टॅग्स :विराट कोहलीनीतेश राणे