Join us  

आनंद पोटात मावेना... विराट कोहलीची IPL 2020 जेतेपदवाली Feeling; पाहा भन्नाट Video

RCBनं 2009 ते 2011या कालावधीत सलग तीनवेळा प्ले ऑफमध्ये धडक मारली. 2009 आणि 2011चे ते उपविजेते आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 3:25 PM

Open in App
ठळक मुद्देRCBनं 2009 ते 2011या कालावधीत सलग तीनवेळा प्ले ऑफमध्ये धडक मारली2009, 2011 आणि 2016चे ते उपविजेते आहेत

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही, हा इतिहास आहे. पण, यंदा हा इतिहास बदलण्यासाठी विराट सज्ज आहे. रविवारी RCBनं पोस्ट केलेल्या व्हिडीओत विराट कोहली त्या जेतेपदाच्या Feeling अनुभवत असल्याचे दिसले. 

IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी? 

IPL 2020च्या पहिल्या सामन्यापेक्षाही चर्चा रंगलीय 'या' सुंदरीची; पाहा फोटो

RCBनं 2009 ते 2011या कालावधीत सलग तीनवेळा प्ले ऑफमध्ये धडक मारली. 2009 आणि 2011चे ते उपविजेते आहेत. त्यानंतर 2015 व 2016मध्ये त्यांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला, परंतु 2016च्या मोसमात पुन्हा एकदा त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. RCB संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक अ‍ॅडम ग्रिफीथ यांनी यॉर्कर चॅलेंजचं आयोजन केलं होतं. यात अधिक भेदक यॉर्कर टाकणाऱ्या गोलंदाजाला पॉईंट देण्यात येत होते. यावेळी विराटचा एक वेगळाच अवतार समोर आला आहे. नवदीप सैनी, उमेश यादव, शिवम दुबे, युजवेंद्र चहल आणि इतर गोलंदाजांनी चॅलेंजमध्ये सहभाग घेतला.  

IPL 2020 : रोहित शर्मासह Mumbai Indiansच्या खेळाडूंची पुन्हा झाली कोरोना टेस्ट; पाहा व्हिडीओ

पाहा व्हिडीओ… 

संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)

21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघएबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अॅरोन फिंच, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे, अॅडम झम्पा, ख्रिस मॉरिस

टॅग्स :आयपीएल 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहली