IPL 2020मध्ये 'Purple Cap'च्या शर्यतीत पाच दावेदार; कोण मारेल बाजी?

यंदाच्या IPL 2020मध्ये पर्पल कॅपचे पाच दावेदार आहेत आणि त्यापैकी एक नक्की यंदाची आयपीएल गाजवेल..

पण, आतापासूनच चर्चा रंगू लागलीय ती जेतेपद कोण पटकावणार, पर्पल ( Purple Cap), ऑरेंज ( Orange Cap) कॅप शर्यतीत कोणाचे पारडे जड असेल, यावरही चर्चा रंगत आहे.

आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्सचा ( Chennai Super Kings) अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो ( Dwayne Bravo) आणि सनरायझर्स हैदराबादचा ( Sunrisers Hyderabad) जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar) यांनी प्रत्येकी दोनवेळा पर्पल कॅप ( Purple Cap) जिंकलेली आहे.

IPLच्या 12 मोसमात आतापर्यंत केवळ दोनच फिरकीपटूंना पर्पल कॅप जिंकता आलेली आहे. प्रग्यान ओझा ( Pragyan Ojha) आणि इम्रान ताहीर ( Imran Tahir) यांनी अनुक्रमे 2010 व 2019मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे.

यंदाच्या IPL 2020मध्ये पर्पल कॅपचे पाच दावेदार आहेत आणि त्यापैकी एक नक्की यंदाची आयपीएल गाजवेल..

जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) - लसिथ मलिंगाच्या ( Lasith Malinga) अनुपस्थितीत मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) गोलंदाजीची संपूर्ण जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असणआर आहे. MIच्या या खेळाड़ूनं मागील मोसमात 16 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या होत्या.

पॅट कमिन्स ( Pat Cummins) - IPL Auction 2020त कोलकाता नाइट रायडर्सनं ( Kolkata Knight Riders) सर्वाधिक 15.5 कोटी रक्कम मोजून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. IPL Auction 2020मधील तो सर्वात महागडा खेळाडू ठरला. कसोटी आणि वन डे क्रमवारीत पहिल्या व चौथ्या स्थानावर असलेल्या पॅट कमिन्सकडून फ्रँचायझीला दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्यानं आतापर्यंत 30 ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 6.93च्या इकॉनॉमीनं 37 विकेट्स घेतल्या आहेत.

इम्रान ताहिर ( Imran Tahir) - वय हे फक्त नंबर असते... हेच चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) इम्रान ताहीरनं दाखवून दिलं आहे. मागील मोसमात त्यानं 17 सामन्यांत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या होत्या.

युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणारा गोलंदाज म्हणून युजवेंद्र चहल ओळखला जातो. UAEमधील फिरकीला पोषक खेळपट्टींवर तो RCBला यश मिळवून देईल, अशी विराट कोहलीला अपेक्षा आहे. मागील मोसमात चहलनं 14 सामन्यांत 18 विकेट्स घेतल्या होत्या.

कागिसो रबाडा ( Kagiso Rabada ) - दिल्ली कॅपिटल्सचा ( Delhi Capitals) गोलंदाज मागील मोसमात पर्पल कॅपच्या अगदी नजिक पोहोचला होता. त्यानं 12 सामन्यांत 25 विकेट्स घेतल्या होत्या. IPLमध्ये 18 सामन्यांत त्याच्या नावावर 31 विकेट्स आहेत.

Read in English