Virat Kohli Century For Delhi Against Andhra In The Vijay Hazare And Breaks Sachin Tendulkar Record : भारताचा महान फलंदाज विराट कोहलीनं याने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांनी दमदार कमबॅक करताना मास्टर ब्लास्टरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात आंध्र प्रदेशविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या संघाकडून खेळताना ३७ वर्षीय कोहलीने विराट कोहलीनं दमदार शतक झळकावले. या खेळीसह त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये १६ हजार धावांचा पल्लाही पार केला. हा मैलाचा पल्ला सर्वात वेगाने गाठताना त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम
याआधी लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने १६ हजार धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने ३९१ डावात १६ हजार धावा केल्या होत्या. किंग कोहलीनं ३३० व्या सामन्यात हा टप्पा गाठत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ३७ वर्षीय कोहलीने दिल्लीकडून आंध्र प्रदेशविरुद्ध झालेल्या विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात, बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे हा ऐतिहासिक टप्पा गाठला. या कामगिरीसह १० हजार धावांचा टप्पा पार केल्यावर प्रत्येक हजारीच्या टप्प्यासह तो नवा विक्रम प्रस्थापित करताना पाहायला मिळाले आहे.
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
आधी विराटनं प्रियांश आर्याच्या साथीनं केली शतकी भागीदारी
बंगळुरु स्थित बीसीसआयच्या एक्सलेन्स ग्राउंडवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात आंध्र प्रदेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना रिकी भुईच्या १२२ (१०५) दमदार शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित ५० षटकांत ८ विकेट्सच्या मोबदल्यात २९८ धावा करत दिल्लीच्या संघासमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. प्रियांश आर्यच्या साथीनं दिल्लीच्या डावाची सुरुवात करताना अर्पित राणा खातेही न उघडता माघारी फिरला. तो बाद झाल्यावर किंग कोहलीची मैदानात एन्ट्री झाली. प्रियांश आर्यसोबत त्याने दुसऱ्या विकेटासठी ११३ धावांची भागीदारी रचली. सलामीवीर प्रियांश आर्य ४४ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७४ धावांवर बाद झाला.
मग विराट आणि नितीश राणाची जमली जोडी
त्यानंतर विराट-नितीश राणा जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची भागीदारी रचत आंध्र प्रदेशच्या गोलंदाजांचे कांदा पाडले. विराट कोहलीनं या सामन्यात १०१ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीच्या संगाने ४ विकेट्स राखून३८ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मॅच संपवली.