Join us

जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा

RCB संघ पहिल्यांदा IPL चॅम्पियन ठरल्यावर विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटवर व्यक्त केलेले प्रेम आणि भारत-इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसंदर्भ जोडत माजी ऑस्ट्रेलियनं क्रिकेटरनं हा मोठा दावा केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 11:26 IST

Open in App

Virat Kohli Can Return In Test Cricket : विराट कोहलीशिवाय भारत-इंग्लंड यांच्यातील रेड बॉल क्रिकेटमधील खेळाची मेजवाणीची 'टेस्ट' फिकी ठरणार का? अशी चर्चा रंगत असताना ऑस्ट्रेलियन दिग्गजाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या विराट कोहलीसंदर्भात मोठा दावा केला आहे. विराट कोहली कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा रेड बॉल क्रिकेट खेळण्यासाठी तयार होईल, असे वक्तव्य मायकेल क्लार्क (Michael Clarke) याने केले आहे. RCB संघ पहिल्यांदा IPL चॅम्पियन ठरल्यावर विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटवर व्यक्त केलेले प्रेम आणि भारत-इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसंदर्भ जोडत माजी ऑस्ट्रेलियनं क्रिकेटरनं हा मोठा दावा केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्याचा विचार करेल

भारत-इंग्लंड दौऱ्याआधी मायकेल क्लार्क याने आपल्या युट्यूब चेनलवरील एका व्हिडिओच्या माध्यमातून विराट कोहली आणि भारतीय संघ यावर भाष्य केले आहे. तो म्हणाला आहे की, मला वाटते जर इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला ५-० अशा पराभवाचा सामना करावा लागला तर  चाहत्यांमध्ये विराट कोहलीने पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये खेळावे ही भावना दाटून येईल. कॅप्टन आणि बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी त्याला पुन्हा खेळण्याची विनंती केली तर तो पुन्हा कसोटी खेळण्याचा निश्चितच विचार करेल, अशी मला खात्री वाटते, असे मायकेल क्लार्कने म्हटले आहे.

KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी

इंग्लंड दौऱ्याआधी अचानक विराट कोहलीनं घेतला कसोटी निवृत्तीचा निर्णय

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्याआधी १२ मे रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्याशिवाय रेड बॉल क्रिकेटमधील 'टेस्ट' फिकी ठरेल, अशा प्रतिक्रियाही उमटल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीला मनवण्यासाठी बीसीसीआयने प्रयत्न केले पण तो आपल्या निर्णयावर ठाम राहिला, असेही बोलले जाते. त्याच्या अनुपस्थितीत इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचं कसं होणार? ही चर्चा रंगत असताना आता मायकेल क्लार्कनं टीम इंडियाला गरज असेल तो आपल्या निर्णयावर निश्चित विचार करेल, असा दावा केल्याचे दिसते. 

कसोटीत दमदार कामगिरी 

विराट कोहलीनं आपल्या कसोटी कारकिर्दीत १२३ सामन्यात ४६.८५ च्या सरासरीसह एकूण ९,२३० धावा केल्या आहेत. यात त्याच्या भात्यातून ३० शतकासह ३१ अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीच्या मैदानात तो अखेरचा कसोटी सामना खेळला होता. 

टॅग्स :विराट कोहलीभारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा