Join us

भावा, हा तू आहेस का? विराट कोहलीचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी गोलंदाज कन्फ्यूज 

टर्किश वेब सीरिजमध्ये दिसला विराट कोहलीचा डुप्लिकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 15:51 IST

Open in App

कोरोना व्हायरसमुळे क्रीडा स्पर्धा बंद आहेत आणि त्यामुळे क्रिकेटपटूंना घरीच रहावे लागत आहेत. अशात खेळाडू आपापल्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देत आहेत. त्याशिवाय सोशल मीडियावरून चाहत्यांशी गप्पा किंवा वेब सीरिज पाहण्यात व्यस्थ आहेत. पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद आमीर अशीच एक वेब सीरिज पाहत होता. टर्किश टीव्ही सीरिज Dirilis Ertugrul Ghazi मधील एक पात्र हुबेहुब कोहलीसारखा दिसत आहे. आमीरनं त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि भावा, हा तूच आहेस का? असा प्रश्न विराटाल विचारला.

मोठा निर्णय : 53 चेंडूंत 222 धावा, आफ्रिकेच्या फलंदाजासाठी न्यूझीलंडनं तोडला नियम

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं ( पीसीबी) गुरुवारी जाहीर केलेल्या खेळाडूंच्या सेंट्रल करारातून मोहम्मद आमीर आणि वाहब रियाझ यांना वगळण्यात आले आहे.  28 वर्षीय आमीरनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, परंतु तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. त्यानं 

त्यानं ट्विट केलं की,''विराट कोहली भावा हा तूच आहेस का, मी कन्फ्यूज आहे.''विराट कोहलीसारखा दिसणाऱ्या या अभिनेता व दिग्दर्शकाचे नाव कॅव्हीट केटीन गनर असं आहे. Dirilis Ertugrul Ghazi ही सीरिज 2014मध्ये रिलीज झाली. त्यानंतर 2019मध्ये पुन्हा रिलीज करण्यात आले.    

अन्य महत्त्वाच्या बातम्या

रवी शास्त्रींची रोखठोक भूमिका; आधी आयपीएल, स्थानिक क्रिकेट सुरू व्हायला हवं, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप नंतर!

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

Video : सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा अन् हरभजन सिंग यांना युवराज सिंगचं चॅलेंज

Video : दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या घरी अचानक आले दिल्ली पोलीस अन्...

शाहिद आफ्रिदीचं जलद शतक अन् सचिन तेंडुलकरची बॅट; काय आहे नेमकं कनेक्शन?

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तान