Join us

Viral Video: अनुष्कानं विराटला हात पकडून उचललं; कोहलीच्या तोंडून पटकन निघालं...

Virat Kohli and Anuskhka Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे सर्वाधिक चर्चेतलं कपल म्हणून ओळखलं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 14:49 IST

Open in App

Virat Kohli and Anuskhka Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे सर्वाधिक चर्चेतलं कपल म्हणून ओळखलं जातं. दोघांनीही सोशली मीडियावर तुफान फॅन फॉलोइंग आहे. क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ मिळतो तेव्हा विराट नेहमीच अनुष्कासोबत वेळ व्यतित करुन दोघं काही सुंदर क्षणांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियातमध्ये पोस्ट करत असतात. 

अनुष्कानं आता एक नवा व्हिडिओ पोस्ट केलाय. एका फोटोशूट दरम्यान हा व्हिडिओ चित्रीत केला गेल्याचं सांगण्यात येत आहे. विराट-अनुष्काची सुंदर जोडी आणि त्यांच्यातला उत्तम संवाद यात दिसून येतो. दोघंही खूप मस्तीच्या मूड आहेत. 

अनुष्का विराट कोहलीला दोन्ही हातांनी पाठीमागून उचलण्याचा प्रयत्न करतेय. अनुष्काला यात यशही येतं आणि तिची ताकद पाहून विराटही आश्चर्यचकीत झाला. अनुष्कानं विराटला उचलातच त्याच्या तोंडून 'ओ तेरी' अशी प्रतिक्रिया आली आणि अनुष्काही हसू लागली. 

अनुष्का विराटला पहिल्यांदा उचलते तेव्हा "तू मला मदत करत आहेस. तू स्वत:ला उचलून घेण्यासाठी जोर लावू नकोस. मला प्रयत्न करु देत", असं अनुष्का विराटला सांगते. त्यानंतर अनुष्का अगदी सहजरित्या विराटला उचलते आणि आनंद व्यक्त करताना दिसते. 

अनुष्का आणि विराट यांना ११ जानेवारी रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला होता. दोघांनी आपल्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. सध्या दोघंही एकमेकांना चांगला वेळ देत आहेत. इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही अनुष्का आणि वामिका विराटसोबतच होते.  

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माभारतीय क्रिकेट संघ