Join us

Virat Kohli, Vamika Birthday: विराटची लेक झाली २ वर्षांची.... 'बाप'माणसाने पोस्ट केला गोंडस फोटो, तुम्ही पाहिलात? 

विराट वामिकाच्या जन्माच्या वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 20:22 IST

Open in App

Virat Kohli, Vamika Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा हे 'हॉट अँड फिट' कपल म्हणून ओळखलं जातं. हे दोघे कायम प्रकाशझोतात असले तरी त्यांची लेक वामिका हिला मात्र त्यांना अद्याप लाईमलाईट आणि मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूरच ठेवणं पसंत केलं आहे. विरूष्काची लेक आज दोन वर्षांची झाली आहे. या दोघांनी अद्याप वामिकाचा चेहरा कोणालाही दाखवलेला नाही. परंतु ते सतत मुलीसोबत वेगवेगळ्या प्रकारचे गोड फोटो पोस्ट करत असतात. आपल्या लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, विराट कोहलीने एक अतिशय गोड फोटो पोस्ट केला आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी बुधवारी, ११ जानेवारीला ११ वर्षांची झाली. कोहलीने त्याच्या मुलीच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला. कोहलीने एक फोटो शेअर केला ज्यामध्ये वामिकाचा चेहरा नेहमीप्रमाणे दिसत नाही पण ती तिच्या वडिलांच्या छातीवर अगदी आरामात डोकं टेकून झोपली आहे. फोटोत कोहली तिच्याकडे प्रेमाने बघताना दिसत आहे. पाहा फोटो-

याशिवाय अनुष्काने देखील तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये वामिका तिच्या मांडीवर बसलेली दिसत होती. अनुष्काने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दोन वर्षांपूर्वी ही छान गोष्ट माझ्या आयुष्यात आली.'

दरम्यान, २०२० मध्ये आयपीएलमध्ये या जोडप्याने सोशल मीडियावर सांगितले होते की ते लवकरच पालक बनणार आहेत. वर्षाच्या शेवटी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली पण कोहली दौऱ्याच्या पहिल्या सामन्यानंतर परतला. कारण बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला अनुष्कासोबत राहायचे होते. त्यांच्या मुलीचा जन्म ११ जानेवारी २०२१ रोजी झाला. विराट कोहली आणि अनुष्का कधीही आपल्या मुलीचा चेहरा दाखवत नाहीत. त्याने पापाराझी फोटोग्राफर्सना आपल्या मुलीचे फोटो क्लिक करू नये असे आवाहन केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्यांच्या मुलीचा चेहरा समोर आल्यावर त्यांनी सोशल मीडियावर टीका केली होती.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मासोशल मीडिया
Open in App