भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. क्रिकेट जगतातील सर्वात फिट अँण्ड हिट क्रिकेटरनं घेतलेला हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करून सोडणारा होता. कसोटीआधी कोहलीनं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली असून आता तो फक्त वनडे खेळताना दिसणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बायकोसोबत जोकोविचला चीअर करताना दिसला विराट
आगामी वनडे मालिकेआधी
विराट कोहली लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान त्याने लंडनमध्ये सुरु असलेल्या
विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील नोव्हाक जोकोविचचा सामना पाहण्यासाठी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि
अनुष्का शर्मा दोघे जोडीनं ग्रँडस्लॅम स्पर्धेचा किंग जोकोविचचा खेळ पाहताना दिसले. कोर्टवरील जोकोविचचा खेळ अन् त्या दरम्यान प्रेक्षकांच्या गर्दीत विरुष्काची दिसलेली फ्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसते.
SENA देशांत टीम इंडिया नंबर वन! इंग्लंडच्या खांद्यावरून साधला पाकवर निशाणा
दोन दिग्गजांच्या इन्स्टा स्टोरीनं वेधलं लक्ष
Virat Kohli And Novak Djokovic
मॅचनंतर विराट कोहलीनं जोकोविचसाठी इन्स्टा स्टोरीच्या माध्यातून खास पोस्ट शेअर केल्याचेही पाहायला मिळाले. एवढेच नाहीतर ग्रँडस्लॅमचा राजा नोव्हाक जोकोविचनं क्रिकेटच्या मैदानातील किंग विराट कोहलीला पाठिंबा दिल्याबद्दल आभारही मानले आहेत. वेगवेगळ्या खेळातील दोन दिग्गज खेळाडूंच्या इन्स्टा स्टोरीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हे सगळं घडत असताना काही नेटकऱ्यांनी जोकोविचच्या वयाचा दाखला देत विराट कोहलीला ट्रोल केल्याचेही पाहायला मिळाले.
तो ३८ वर्षांचा असून १०० टक्के देतोय, अन् विराट ३६ व्या वर्षी...
वयाच्या ३८ व्या वर्षीही नोव्हाक जोकोविच कोर्टवर १०० टक्के देतोय अन् ३६ व्या वर्षी विराट कोहली रिटायरमेंट घेऊन त्याला सपोर्ट करतोय. ही गोष्ट मनाला खटकणारी आहे, असे म्हणत एका नेटकऱ्यांने कोहलीला ट्रोल केल्याचेही दिसते. कोहलीनं निवृत्तीचा निर्णय खूप लवकर घेतलाय, असा सूर या पोस्टमध्ये दिसून येतो. विराट कोहली हा क्रिकेट जगतातील सर्वोत फिट खेळाडू आहे. कसोटीत तो किमान चार वर्षे अगदी सहज खेळू शकला असता. पण त्याने इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटमधून थांबण्याचा निर्णय घेतला. वनडेत तो आणखी किती वर्षे खेळणार ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Virat Kohli And Anushka Sharma Watch Novak Djokovic Wimbledon Match Fans Say 36 Years Old Retired Cricketer
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.