Join us

IPL 2021: विराट, डीव्हिलियर्सनं मन जिंकलं! दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या चिमुकल्यासाठी केला खास Video

IPL 2021: हृदयविकाराशी संबंधित एका दुर्मिळ आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्या मुलासाठी डीव्हिलियर्सनं विराट कोहलीसह एक व्हिडिओ शूट करुन संदेश देऊ केला आहे. कोहली आणि डीव्हिलियर्सनं या कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:12 IST

Open in App

IPL 2021: भारतात क्रिकेटला धर्मच मानतात. केवळ भारतीयच नव्हे, तर परदेशी क्रिकेटपटूंचेही लाखो चाहते भारतात आहेत. त्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि द.आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डीव्हिलियर्स यांचे कोट्यवधी चाहते भारतात आहेत. दोघंही आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून एकत्र खेळतात. सध्या दोघही आयपीएलमध्ये व्यग्र असले तरी त्यांनी एका चिमुकल्यासाठी वेळातवेळ काढू एक व्हिडिओ शूट केला आहे. हृदयविकाराशी संबंधित एका दुर्मिळ आजाराशी लढा देणाऱ्या चिमुकल्या मुलासाठी डीव्हिलियर्सनं विराट कोहलीसह एक व्हिडिओ शूट करुन संदेश देऊ केला आहे. कोहली आणि डीव्हिलियर्सनं या कृतीनं अनेकांची मनं जिंकली आहेत. (Virat Kohli and AB de Villiers send a heartwarming message to a kid recovering from a serious heart disorder)

IPL 2021: गेल्या वर्षी CSKचं नेमकं काय चुकलं?, महेंद्रसिंग धोनीनं अगदी सोप्या शब्दात सांगितलं...

प्रियांशू नावाचा एक दिल्लीस्थित चिमुकला एबी डिव्हिलियर्सचा चाहता आहे. एका 'ब्लड डोनर्स इन इंडिया' नावाच्या संस्थेकडून प्रियांशूच्या दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. त्यात त्यांना यश आलं असून प्रियांशूवर नुकतंच बोस्टन येथे यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. प्रियांशू सध्या सुखरूप असून तो आराम करतोय. तो एबी डीव्हिलियर्सचा चाहता असल्याचं कळताच संस्थेकडून डीव्हिलियर्स याच्याशी संपर्क साधण्यात आला आणि डीव्हिलियर्सनंही मोठ्या मनानं प्रियांशूसाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड करुन त्याला सरप्राइज दिलं आहे. 

IPL 2021: ऋतूराजमध्ये CSKचा कर्णधार होण्याची पूर्ण क्षमता; वीरेंद सेहवागचं मोठं विधान!

"हेलो प्रियांशू, तुझी तब्येत आता ठीक आहे अशी आशा आहे. मला तुझ्या शस्त्रक्रियेबाबत कळालं. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. तू ज्या परिस्थितीवर मात केलीयस ते पाहता तू खूप शूर आहेस. तू अडथळ्यावर मात केली आहेस आणि लवकरच पूर्णपणे बरा होशील असा विश्वास आहे", असं विराट कोहलीनं व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. तर एबी डीव्हिलियर्सनं प्रियांशूसाठी खास संदेश दिला आहे. 

"तू आमच्यासाठी प्रेरणास्थान ठरतो आहेस. तू ज्या परिस्थितीचा सामना केला आहे ते तुझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं याची कल्पना मला आहे. तू विजयी झालास त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि असाच कणखर राहा. तू लवकरच बरा होऊन सुखरूपरित्या भारतात परतशील अशी प्रार्थना करतो", असं एबी डीव्हिलियर्सनं म्हटलं आहे. 

आरसीबीची आयपीएलमध्ये दमदार कामगिरीयंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून जबरदस्त कामगिरी पाहायला मिळत आहे. संघानं आतापर्यंत ६ पैकी पाच सामन्यांमध्ये विजय प्राप्त केला आहे. स्पर्धेची सुरुवात आरसीबीनं सुरुवातीचे सलग चार सामने जिंकून केली. त्यानंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघानं आरसीबीचा विजयी रथ रोखला. पण त्यानंतर आरसीबीनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पुनरागमन करत पाचवा विजय प्राप्त केला.  

टॅग्स :आयपीएल २०२१विराट कोहलीएबी डिव्हिलियर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर