Virat kohli: कर्णधारपद गेलं आता स्पर्धा कुणाशी करणार? विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्याचा फोटो शेअर करत दिलं थेट उत्तर 

Virat kohli News: विराट कोहलीने एक फोटो शेअर करत कर्णधारपद सोडल्यानंतर चांगल्या कामगिरीसाठी कुणासोबत स्पर्धा करणार या प्रश्नाचं विराट कोहलीने सूचक उत्तर दिले आहे. विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 02:37 PM2022-01-30T14:37:38+5:302022-01-30T14:38:19+5:30

whatsapp join usJoin us
Virat Kohli: After losing the captaincy, who will you compete with? Virat Kohli shared a photo of his opponent and gave a direct answer | Virat kohli: कर्णधारपद गेलं आता स्पर्धा कुणाशी करणार? विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्याचा फोटो शेअर करत दिलं थेट उत्तर 

Virat kohli: कर्णधारपद गेलं आता स्पर्धा कुणाशी करणार? विराट कोहलीने प्रतिस्पर्ध्याचा फोटो शेअर करत दिलं थेट उत्तर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - दक्षिण आफ्रिकेतील दारुण पराभानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही मालिका अनेक अर्थांनी खास ठरणार आहे. या मालिकेमधून भारताच्या एकदिवसीय संघाचं नेतृत्व हे नवा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. तर माजी कर्णधार विराट कोहली आपल्या फलंदाजीची ताकद दाखवण्यासाठी सर्वशक्तिनिशी मैदानात उतरणार आहे.

दरम्यान, विराट कोहलीने एक फोटो शेअर करत कर्णधारपद सोडल्यानंतर चांगल्या कामगिरीसाठी कुणासोबत स्पर्धा करणार या प्रश्नाचं विराट कोहलीने सूचक उत्तर दिले आहे. विराट कोहलीने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट कोहली हा आरशासमोर उभा राहिला आहे. तसेच त्याने या फोटोखाली लिहिले की, नेहमी आपली स्पर्धा ही आपल्याशीच होत असते.

विराट कोहलीचा हा फोटो आणि त्यातील लुक फॅन्सना खूप आवडला आहे. तसेच हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. विराट कोहलीसाठी ही मालिका खूप खास ठरणार आहे. टी-२०, एकदिवसीय आणि नंतर कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यावर आता विराट कोहली केवळ फलंदाज म्हणून भारतीय संघाकडून खेळणार आहे. मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे विराट कोहली पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.

तसं पाहता कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरोधात एकदिवसीय मालिका खेळली होती. मात्र त्यावेळी संघाचं नेतृत्व हे विराट कोहलीकडे होते. कारण रोहित शर्मा दुखापतीमुळे या मालिकेत खेळला नव्हता. मात्र आता रोहित शर्माने संघात पुनरागमन केलं असून, तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच विराट कोहलीने कसोटी कर्णधारपद सोडल्याने कसोटी कर्णधारपदाची माळही रोहित शर्माच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Virat Kohli: After losing the captaincy, who will you compete with? Virat Kohli shared a photo of his opponent and gave a direct answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.