Join us

IND Vs SL 1st Test: ‘कधी वाटलं नव्हतं की १०० कसोटी सामने खेळेन’, शंभराव्या कसोटीपूर्वी विराट कोहली भावूक 

Virat Kohli 100th Test: उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणारा पहिला कसोटी सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:26 IST

Open in App

मोहाली - उद्यापासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणारा पहिला कसोटी सामना भारताचा कर्णधार विराट कोहलीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. विराट कोहली त्याचा कसोटी कारकिर्दीमधील १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा एक इमोशनल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. १०० कसोटी सामने खेळेन, असे कधी वाटले नव्हते, असे विराट कोहली या व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

विराट कोहलीने हे भावूक विधान बीसीसीआयकडून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये केले आहे. बीसीसीआयने एक शॉर्ट व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यात विराट कोहलीने सांगितले की, प्रामणिकपणे सांगायचं तर मी जीवनामध्ये कधीही विचार केला नव्हता की मी १०० कसोटी खेळू शकेन. हा एक खूप प्रदीर्घ प्रवास आहे.

विराट पुढे म्हणाले की, मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मला १०० कसोटी सामने खेळण्याचे भाग्य मिळाले. या प्रवासामध्ये मी खूप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलो. येथे पोहोचण्यासाठी मला खूप कठोर मेहनत घ्यावी लागली. हा क्षण माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी फार मोठा आहे. विशेषकरून माझ्या प्रशिक्षकांसाठी ज्यांना सर्वाधिक आनंद झाला आहे. मी माझ्या करिअरमध्ये त्यांच्याकडूनच खूप काही शिकलो होतो. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघ
Open in App