विराट- कोहली वादावर कपिल देव यांचे मोठे विधान

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 08:01 IST2019-08-02T07:54:44+5:302019-08-02T08:01:49+5:30

whatsapp join usJoin us
Virat - Kapil Dev's big statement on Kohli dispute | विराट- कोहली वादावर कपिल देव यांचे मोठे विधान

विराट- कोहली वादावर कपिल देव यांचे मोठे विधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात मैदानाबाहेर मतभेद असले तरी त्याचा फारसा फरक पडत नाही. कारण, मैदानावर दोघांनीही चांगली कामगिरी केली आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.

तसेच ‘‘मैदानाबाहेर दोघांमध्ये मतभेद असू शकतात. मात्र मैदानावर दोघे कशी कामगिरी करतात, हे महत्वाचे आहे असे मला वाटते. त्याचसोबत प्रत्येकाने दोघांची मैदानावरील कामगिरी लक्षात घेतली पाहिजे. मैदानाबाहेर दोघांचीही विचारसरणी तसेच दृष्टिकोन वेगळा असू शकतो. प्रसारमाध्यमांनाही या गोष्टीचे अधिक जबाबदारीने वृत्तांकन करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. तसेच रोहितने विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला इंन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या होत्या. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्याआधी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने सर्व आरोप फेटाळून लावले.

या सर्व चर्चांवर कोहली म्हणाला की,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी असल्याचे त्याने स्पष्ट केले.

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या ट्वेंटी- 20 मालिकेसाठी भारतीय संघ अमेरिकेत दाखल झाला आहे. भारतीय संघाचा वर्ल्ड कपनंतरचा हा पहिलाच दौरा आहे. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी -20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

  • ट्वेंटी-20 मालिका

3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून
6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून

  • वन डे मालिका

8 ऑगस्ट, पहिला सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, सायंकाळी 7 वा. पासून
11 ऑगस्ट, दुसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून
14 ऑगस्ट, तिसरा सामना, क्विन पार्क ओव्हल, त्रिनिदाद, सायंकाळी 7 वा.पासून

  • कसोटी मालिका

22 ते 26 ऑगस्ट, पहिला सामना, सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियम, अँटीग्वा, सायंकाळी 7 वा.पासून
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, दुसरा सामना, सबीना पार्क, जमैका, रात्री 8 वा.पासून

 

Web Title: Virat - Kapil Dev's big statement on Kohli dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.