‘विराट’रूप परतले ! ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, तो क्षण

कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 06:33 IST2022-09-09T06:31:21+5:302022-09-09T06:33:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Virat is back The moment that all cricket lovers have been waiting for | ‘विराट’रूप परतले ! ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, तो क्षण

‘विराट’रूप परतले ! ज्या क्षणाची सर्व क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा होती, तो क्षण

अखेर जवळपास तीन वर्षांनी आला. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीने अखेर आपल्या स्फोटक फलंदाजीचा तडाखा दिला. आशिया चषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या औपचारिकता राहिलेल्या सामन्यात ६१ चेंडूंत १२ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाडत नाबाद १२२ धावांचा झंझावात सादर केला.

२२ नोव्हेंबर २०१९
कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष.

काेहली दुसऱ्या स्थानी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावताना ७१ वे शतक ठोकले.

१०२० दिवसांनी शतक -
-  ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक.
-  पहिले आंतरराष्ट्रीय 
टी-२० शतक.
-  आंतरराष्ट्रीय टी-२० मधील सर्वोत्तम भारतीय खेळी.
-  आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शंभर षटकारांचा टप्पा केला पार.
-  आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३५०० धावांचा टप्पा पार.

कोहलीचे हे शतक ऐतिहासिक ठरले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोहलीने भारताकडून सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करताना कर्णधार रोहित शर्माची ११८ धावांची खेळीही मागे टाकली. 

सर्वाधिक शतक ठाेकणारे -
सचिन - १०० - (७७२ डाव)
कोहली - ७१ (५२२ डाव)
पाँटिंग -७१ (६६८ डाव)
 

Web Title: Virat is back The moment that all cricket lovers have been waiting for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.