टीम इंडियाचा कसोटी कर्णधार शुबमन गिल इंग्लंडमध्ये दमदार खेळी करतोय. त्यासोबतच तो आणखी एका कारणामुळेही चर्चेत आहे. शुबमन गिलसह संपूर्ण टीम इंडिया युवराज सिंगच्या एका कार्यक्रमाला उपस्थित होती. सचिन तेंडुलकर, त्याची पत्नी अंजली आणि मुलगी सारा हेदेखील त्याच कार्यक्रमात आले होते.कार्यक्रमात शुबमन आणि साराला पाहून लोकांनी पुन्हा एकदा त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. आता सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. असा दावा केला जातोय की, या व्हिडीओमध्ये रवींद्र जाडेजा शुबमन गिलला चिडवत आहे, कारण सारा तेंडुलकरची आई अंजली जवळच बसली आहे.
जाडेजाने शुभमनला चिडवलं
व्हिडिओमध्ये शुभमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जाडेजा एकत्र बसलेले दिसतात. सचिन तेंडुलकरचे कुटुंब शेजारीच बसलेले दिसते. टीम इंडियाचे खेळाडू सचिनशी काहीतरी बोलताना दिसतात. त्यानंतर साराची आई अंजली तेंडुलकर या तिथेच बसून टीम इंडियाकडे पाहून स्मितहास्य करतात. ते पाहून रवींद्र जाडेजा शुभमनला चिडवताना दिसतो. जाडेजा शुबमनला चिडवतो, तेव्हा केएल राहुलदेखील खूप हसतो आणि ऋषभ पंत जाडेजाच्या पाठीवर थाप मारतो. त्यानंतर सचिनचे नाव घेतले जाते. सगळे टाळ्या वाजवू लागतात आणि तो उठून पुढे मंचावर जातो. पाहा व्हायरल व्हिडीओ-
दरम्यान, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरसोबचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो आणि व्हिडीओ चर्चेत आहे. हा फोटोही त्याच लंडनमधील कार्यक्रमाचा आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंसह अनेक दिग्गज येथे उपस्थित होते. युवराज सिंगच्या 'यू वी कॅन फाउंडेशन'साठी लंडनमध्ये एका चॅरिटी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विराट कोहली, ख्रिस गेल, केविन पीटरसन आणि सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज खेळाडू सहभागी झाले होते. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल देखील संपूर्ण टीमसह पोहोचला होता आणि सारा तेंडुलकर देखील त्याच कार्यक्रमात होती. त्यावेळी दोघे एकमेकांच्या समोर आले आणि त्याचावेळचा फोटो व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण आले.