मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आज आयपीएल २०२५ मधील दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. या महत्वाच्या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका चिमुकल्याने रोहित शर्माला तुला कसे आऊट करायचे? असा प्रश्न विचारला. यावर रोहित शर्माने मजेदार उत्तर दिले.
या स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा दारूण पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्माने अवघ्या ५१ चेंडूत ८१ धावा केल्या. यामुळे मुंबईच्या इंडियन्सच्या संघाला २२८ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात गुजरातच्या संघाला २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एका चिमुकल्या चाहत्याने रोहित शर्माला तुला आऊट कसे करायचे? असे विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित शर्माने 'हे शक्य नाही', असे म्हटले.
आयपीएलच्या पहिल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत पाच विकेट्स गमावून २२८ धावा केल्या. मुंबईकडून रोहित शर्मा (५० चेंडू ८१ धावा), जॉनी बेअरस्टो (२२ चेंडूत ४७ धावा) आणि सूर्यकुमार यादवने सर्वाधिक २० चेंडूत ३३ धावा केल्या. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. तर, मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात गुजरातच्या संघाला २० षटकात ६ विकेट्स गमावून २०८ धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शनने अवघ्या ४९ चेंडूत ८० धावा केल्या. तर, वॉशिंग्टन सुंदरने अवघ्या २४ चेंडूत ४८ धावा केल्या. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, मिचेल सँटनर, अश्विनी कुमार यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.