Join us

video : विनोद कांबळीचा नवा व्हिडिओ समोर, तब्येतीबाबत आली महत्वाची अपडेट...

Vinod Kambli Video : टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 22:14 IST

Open in App

Vinod Kambli Video : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) त्याच्या प्रकृतीमुळे फार चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात विनोदला चालता येत नसल्याचे दिसत आहे. एक पाऊल टाकण्यासाठीही त्याला इतरांची मदत घ्यावी लागत होती. तो व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कधीकाळी आपल्या स्फोटक फलंदाजीने बॉलरला घाम फोडणाऱ्या फलंदाजाची अशी अवस्था पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती. दरम्यान, आता विनोद कांबळीच्या तब्येतीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 

तो व्हिडिओ जुना...सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विनोद कांबळी बाईकजवळ उभा असल्याचे दिसत होता. तो तिथे काही सेकंद उभा राहतो आणि अचानक खाली कोसळू लागतो. त्यानंतर तिथे उभे असलेले काही लोक त्याला आधार देतात. मग त्या व्यक्तींच्या मदतीच्या विनोद कांबळी एक एक पाय पुढे टाकतो. कांबळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या व्हिडिओवर शेकडो कमेंट्स आल्या आल्या. पण, आता तो व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर आली आहे. विनोदच्या मित्रांनी त्याची भेट घेतली आणि त्या व्हायरल व्हिडिओचे सत्य सांगितले.

पाहा नवीन video :-

विनोद कांबळीचा नवा व्हिडिओ समोरविनोद कांबळीचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याची तब्येत ठीक असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत विनोद कांबळी स्वतःला एकदम फिट असल्याचे सांगतोय. तसेच, मी आजही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतो आणि स्पिनर्सचे बॉल मैदानाच्या बाहेर भिरकावू शकतो, असेही विनोद या व्हिडिओमध्ये सांगत आहे. हा व्हिडिओ पाहून विनोद कांबळी आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

टॅग्स :विनोद कांबळीसोशल मीडियासोशल व्हायरलऑफ द फिल्ड