Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा

वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धची विजयाची मालिका भारतानं कायम राखली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 12:37 IST

Open in App
ठळक मुद्देभारतानं सलग सातव्यांदा पाकिस्तानला वर्ल्ड कप स्पर्धेत लोळवलेविजय शंकरनं या सामन्यातून वर्ल्ड कप स्पर्धेत केले पदार्पण

भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होत नसल्या तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांमध्ये उभय संघ एकमेकांना भिडतात. गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना रंगला होता. त्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंना एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं याबाबतचा खुलासा केला. पाकिस्तानविरुद्धचा तो सामना मँचेस्टर येथे रंगला होता आणि त्या सामन्यापूर्वी पाकिस्तानी चाहत्यांकडून भारतीय खेळाडूंना अपशब्द वापरले होते, असा खुलासा विजय शंकरने केला. 

मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून शंकरनं वर्ल्ड कप स्पर्धेत पदार्पण केले आणि पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन त्यानं इतिहास रचला. त्यानं पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकला बाद केले.  या सामन्यात रोहित शर्मा स्टार ठरला होता. रोहितनं 113 चेंडूंत 140 धावांची खेळी करताना टीम इंडियाला 5 बाद 336 धावांपर्यंत मजल मारून दिली होती. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावा करता आल्या. टीम इंडियनानं डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी हा सामना जिंकला. या विजयासह भारतानं वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध ( 7 विजय) मालिका कायम राखली.  

टीम इंडियानं अतिरिक्त अष्टपैलू म्हणून विजय शंकरची वर्ल्ड कपसाठीच्या संघात निवड केली होती. कारकिर्दीतील त्याचा तो पहिलाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्यासाठी तो उत्सुक होता. भारत आर्मीसोबत बोलताना विजय शंकरनं सांगितले की,''त्या सामन्यापूर्वी संघातील काही खेळाडूंसोबत मी कॉफी प्यायला गेलो होतो.  तेव्हा तेथे काही पाकिस्तानी चाहते आमच्याजवळ आले आणि त्यांनी अपशब्द वापरले. भारत-पाकिस्तान सामन्याचा हा माझा पहिला अनुभव होता.''

''आम्ही त्यांना काहीच प्रत्युत्तर दिले नाही. ते अपशब्द वापरत होते आणि आम्ही सर्व रिकॉर्ड केलं. ते चाहते काय करत आहेत, हे आम्ही बसून पाहत होतो,''असेही शंकरने सांगितले. 

India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video  

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ