Join us

विजय शंकरनं केला साखरपुडा; टीम इंडियातील सदस्यांकडून अभिनंदन

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं गुरुवारी साखरपुडा केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 17:51 IST

Open in App
ठळक मुद्देविजय शंकरनं 2018मध्ये श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलेशंकरनं 12 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2019च्या वन डे वर्ल्ड कप संघाचाही तो सदस्य होता.

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं गुरुवारी साखरपुडा केला. इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करून त्यानं ही आनंदाची बातमी दिली. वैशाली विश्वेश्वरन असे त्याच्या भावी पत्नीचं नाव आहे. त्यानं ही आनंदाची बातमी सांगितल्यानंतर टीम इंडियातील अनेक सदस्यांनी त्याचे अभिनंदन केले. त्यात लोकेश राहुल, युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे. करुण नायर, अभिनव मुकुंद आणि जयंत यादव यांनीही त्याचे अभिनंदन केले.

विजय शंकरनं 2018मध्ये श्रीलंकेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर वर्षभरातच त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे संघात पदार्पण केलं. शंकरनं 12 वन डे आणि 9 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. 2019च्या वन डे वर्ल्ड कप संघाचाही तो सदस्य होता. त्याच्या नावावर वन डेत 223 धावा आणि 4 विकेट्स आहेत, तर ट्वेंटी-20त 101 धावा आणि 5 विकेट्स आहेत. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. या आठवड्या अखेरीस हैदराबाद संघ संयुक्त अरब अमिराती येथे दाखल होण्यासाठी रवाना होणार आहे.   

मागील आठवड्यात फिरकीपटू युजवेंद्र चहलनंही साखरपुडा केला. शनिवारी त्यानं साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानं कुटुंबीयांच्या सहमतीनं आम्ही एकमेकांना 'हो' म्हणत आहोत, असे ट्विट केले. त्याच्या या फोटोवर नेटिझन्स आता त्याची फिरकी घेत आहेत. युजवेंद्रच्या होणाऱ्या पत्नीचं नाव धनश्री वर्मा असून ती डॉक्टर, कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर धनश्रीचे अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तिनं युजवेंद्रलाही डान्स शिकवतानाचे व्हिडीओ आहेत.

युजवेंद्रनं 2016 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्यानं आतापर्यंत 52 वन डे आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 91 व 55 विकेट्स घेतल्या आहेत. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय