Vijay Hazare Trophy, Karnataka vs Mumbai, 1st Quarter-Final विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये गत विजेता कर्नाटक विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना बंगळुरुस्थित बीसीसीआयचे सेंटर ऑफ एक्सलेन्स १ च्या ग्राउंडवर रंगल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अवघ्या ६० धावांवर मुंबई संघाचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत
अंगकृष्ण रघुवंशी आणि ईशन मुलचंदानी (Ishan Mulchandani) यांनी संघाच्या डावाची सुरुवात करताना दुहेरी आकडा गाठला. पण ५० चेंडू खेळून रघुवंशी २७ धावांवर माघारी फिरला. दुसऱ्या सलामीवीरानेही २० धावा करून नांगी टाकली. सलामीवीर स्वस्तात माघारी फिरल्यावर मुशीर खानकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्याने एक उत्तुंग षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. पण तो देखील ९ धावांवर तंबूत परतला. मुंबईच्या संघाने अवघ्या ६० धावांवर आघाडीच्या चार विकेट्स गमावल्या होत्या.
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
शम्स मुलानीची लढवय्या खेळी, पण...
संघ अडचणीत असताना कर्णधार सिद्धेश लाड याने ५८ चेंडूत केलेल्या ३८ धावा आणि शम्स मुलानीच्या भात्यातून आलेली लढवय्या खेळीच्या जोरावर मुंबईनं संघाच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या लावली. शम्स मुलानी त्याने ९१ चेंडूत ८ चौकाराच्या मदतीने ८६ धावांची खेळी केली. याशिवाय साईराज पाटीलनं तळाच्या फलंदाजीत २५ चेंडूत ३३ धावांच उपयुक्त योगदान देत मुंबईच्यासंघाने निर्धारित ५० षटकात २५४ धावांपर्यंत मजल मारली. पण या धावांचा बचावर करून मुंबईच्या संघाला सेमीफायनलमधील स्थान पक्के करणं कठीणच आहे. कारण कर्नाटकचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. देवदत्त पड्डिकला रोखणं हे मुंबईच्या गोलंदाजांसमोर सर्वात मोठे आव्हान असेल.
कर्नाटकच्या संघाकडून गोलंदाजीत विद्याधर पाटील ठरला सर्वोत्तम
कर्नाटकच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना मुंबईच्या संघाला अवघ्या २५४ धाांवर रोखले. गोलंदाजीत विद्याधर पाटील सर्वात आघाडीवर राहिला. त्याने १० षटकात ४२ धावा खर्च करत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय कवेरप्पा, अभिलाशशेट्टी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. याशिवाय विजयकुमार वैशक याने एक विकेट घेतली.