Mohammed Shami in Vijay Hazare Trophy : टीम इंडियातील कमबॅक करण्यासंदर्भातील सस्पेन्स कायम असताना मोहम्मद शमीनं थेट मैदानातील कामगिरीनं 'नॉट ओन्ली फिट, आय एम सुपर हिट' असा शो काहीसा शो दाखवला आहे. बंगाल आणि हरयाणा यांच्यातील प्री क्वाटर फायनलची लढत बडोदा येथील मोतीबाग स्टेडिमवर रंगली आहे. या सामन्यात मोहम्मद शमीनं दमदार कामगिरीसर लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळते.
सर्वाधिक विकेट्स घेत दिलं फिट असल्याचे संकेत
या सामन्यात शमीनं बंगाल संघाकडून सर्वाधिक विकेट्स घेत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तंदुरुस्त असल्याचे संकेत बीसीसीआय निवडकर्त्यांना दिले आहेत. मोहम्मद शमीनं १० षटकांच्या कोट्यात ६१ धावा खर्च करताना संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतीसह खेळला अन् वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहिला
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी लवकर बीसीसीआय निवडकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीआधी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात १० ओव्हरच्या कोटा पूर्ण करून पुन्हा एकदा टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असल्याचे संकेत मोहम्मद शमीनं दिले आहेत. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत शमी दुखापतीसह खेळला होता. याचा त्याला मोठा फटका बसला. वर्षभरापेक्षा अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ त्याच्यावर आली.
रणजी स्पर्धेतून क्रिकेटच्या मैदानात कमबॅक, पण टीम इंडियाचे दरवाजे उघडण्याची प्रतिक्षा
बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धे दरम्यान त्याने रणजी करंडक स्पर्धेच्या माध्यमातून वर्षभराच्या अंतराने क्रिकेटच्या मैदानात कमबॅक केले. पण अजूनही त्याच्या फिटनेससंदर्भातील संभ्रम कायम आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील त्याची ही कामगिरी पुन्हा एकदा त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडण्यास फायदेशीर ठरेल, अशीच आहे.