Join us

Video: मनीष पांडेच्या लग्नात थिरकला युवराज सिंग ; डान्स पाहून तरूणी घायाळ

भारताचा मधल्या फळीचा फलंदाज आणि कर्नाटक संघाचा कर्णधार मनीष पांडे याचा नुकताच मुंबईत विवाह झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 14:58 IST

Open in App

भारताचा मधल्या फळीचा फलंदाज आणि कर्नाटक संघाचा कर्णधार मनीष पांडे याचा नुकताच मुंबईत विवाह झाला. दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टी हिच्याशी 30 वर्षीय मनीषनं विवाह केला. मनीषच्या नेतृत्वाखाली रविवारी कर्नाटक संघानं थरारक सामन्यात तामिळनाडूवर एक धावांनी विजय मिळवून सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धा जिंकली. आणि सोमवारी मनीष बोहोल्यावर चढला. पण, या लग्नसोहळ्यात युवराज सिंग भाव खावून गेला. 

मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत. अश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. 26 वर्षी अश्रितानं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती आर पन्नीर्सेलवम यांच्या दिग्दर्शीत चित्रपटातही दिसणार आहे. मनीषच्या लग्नाला केवळ नातेवाईक आणि काही जवळचे मित्रच उपस्थित होते. मनीष - अश्रिता यांच्या लग्नाला भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग उपस्थित होता आणि त्यानं आपल्या डान्सनं या सोहळ्यात रंग भरला. त्याच्या पंजाबी नृत्यावर नवरदेवासह सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडले. 

पाहा व्हिडीओ..  

टॅग्स :युवराज सिंगभारतीय क्रिकेट संघ