मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू पॉल अॅडम त्याच्या गोलंदाजीच्या अपरंपरागत आणि विचित्र शैलीने ओळखला जायचा. त्याच्या शैलीची कॉपी करणे कोणालाच जमले नाही. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात 13 वर्षांचा गोलंदाज हुबेहुब पॉल अॅडमसारखी गोलंदाजी करताना दिसत आहे. त्या गोलंदाजाला दुसरा पॉल अॅडम म्हणून संबोधले जात आहे.
हाँगकाँग क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात 13 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत एक गोलंदाज हुबेहुब अॅडमसारखी गोलंदाजी करताना दिसत आहे.
पॉल अॅडमनेही या पोस्टवर कमेंट केली आहे.
अॅडमने 1995 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात पदार्पण केले. त्याने कसोटी कारकिर्दीत 134, तर वन डेत 29 विकेट घेतल्या आहेत.