Join us

Video : पाक गोलंदाजाचा अप्रतिम यॉर्कर; चेंडू समजण्यापूर्वीच उडाले स्टम्प्स, पण...

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वाहब रियाझ यानं बुधवारी दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20त अफलातून चेंडू टाकला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 10:51 IST

Open in App

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज वाहब रियाझ यानं बुधवारी दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या मॅझन्सी सुपर लीग ट्वेंटी-20त अफलातून चेंडू टाकला. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी रियाझनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो सध्या आफ्रिकेतील ट्वेंटी-20 लीगमध्ये केप टाऊन ब्लित्झ संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आमि त्श्वाने स्टार्टन्स संघाविरुद्ध त्यानं अप्रतिम यॉर्कर टाकला. त्यानं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी फलंदाजांचे स्टम्प्स उडावे होते.

स्पार्टन्सचा फलंदाज रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे याला रियाझच्या यॉर्करचा अंदाज बांधता आला नाही. रियाझच्या त्या चेंडूनं दोन स्टम्प्स हवेत उडाले. पण, त्याचा हा चेंडू नो बॉल ठरला आणि मर्वेला जीवदान मिळालं. मर्वेला या संधीचं सोनं करता आलं नाही आणि स्पार्टन्स  संघाला पराभव पत्करावा लागला. 

पाहा व्हिडोओ..

केप टाऊन ब्लित्झ संघानं 15 धावांनी हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हीड बेडींघॅम आणि जॅनेर्मन मलान यांनी संघाला 5 बाद 157 धावांपर्यंत मजल मारून दिली. बेडींघॅमनं 40 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचून 53 धावा केल्या. मलाननं 28 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह 36 धावा केल्या. व्हेर्नोन फिलेंडरनं 21 धावांची वादळी खेळी केली. स्पार्टन्सकडून लुंगी एनगिडीनं दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्पार्टन्सला 7 बाद 142 धावांपर्यंतच मजल मारता आली. पीएट व्हॅन बिल्जॉननं 42 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 62 धावांची खेळी केली. एबी डिव्हिलियर्सनं 31 धावा करताना संघासाठी संघर्ष केला, परंतु त्याचे विजयात रुपांतर करण्यात ते चुकले. डेल स्टेननं सर्वाधिक ( 3/10) तीन विकेट्स घेतल्या, तर रियाझनं दोन विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :पाकिस्तानटी-20 क्रिकेटद. आफ्रिका